नाद करायचा नाय! 1 मिनिटांत 147 वेळा नाकाला जीभ लावणारा अवलिया

नाद करायचा नाय! 1 मिनिटांत 147 वेळा नाकाला जीभ लावणारा अवलिया

एका मिनिटात 147 वेळा जीभ नाकाला लावण्याच्या पराक्रमाची ग्लोबल रेकॉर्मध्ये नोंद.

  • Share this:

आसिफ मुरसल (प्रतिनिधी) कोल्हापूर, 22 सप्टेंबर: सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचं चॅलेज दिलं जातं आणि ते पूर्ण केलं जातं. मात्र असा एक अवलिया आहे ज्याचं चॅलेंज आतापर्यंत भल्या भल्यांना जमलं नाही. ग्लोबल रेकॉर्डमध्ये आपल्या अफलातून कलेची नोंद व्हावी यासाठी टाकळीवाडीचे नामदेव निर्मळे सादरीकरण करत आहेत. एका मिनिटात 147 वेळा जीभ नाकाला लावण्याच्या पराक्रमाची ग्लोबल रेकॉर्मध्ये नोंद करण्यात आली. ग्लोबल रेकॉर्डमध्ये सादर केलेली कला त्यांनी घरातही करून दाखवली. मोबाईलवर टायमर सेट करून नामदेव किती वेळेस जीभ नाकाला लावतात हे मोजलं.

नामदेव यांना लहानपणापासून नाकाला जीभ लावण्याचा छंद असल्यानं त्यांना कलाकार म्हणून ओळखलं जातं. अनेक जण त्यांना कुठेही भेटल्यावर नाकायला जीभ लावायला सांगतात. कला सादर करण्याची ही फर्माइश निर्मळे टाळत नाहीत. या कलेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या टाकळीवाडीचे नामदेव निर्मळे सध्या चांगलेच फेमस झालेत. त्यांच्या या कलेमुळे निर्मळेंची जोरदार चर्चा सुरू आहे.

नामदेव निर्मळे यांची ही अफलातून कला त्यांची चार वर्षाची मुलगी शौर्या हिनंही शिकून घेतली. शौर्या साठ सेकंदात तब्बल 49 वेळा जीभ नाकाला लावते. नामदेव निर्मळे यांच्या कलेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निर्मळे यांच्या कलेची जगानं नोंद घ्यावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. जीभेवर नियंत्रण नसेल तर जास्त खाऊन वजन वाढतं. तसंच जीभेवर नियंत्रण नसेल तर चुकीचं बोलून वाद निर्माण होतात. मात्र जीभेला जर नामदेव निर्मळे यांच्याप्रमाणे वळवलं तर रेकॉर्ड निर्माण होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kolhapur
First Published: Sep 22, 2019 11:27 AM IST

ताज्या बातम्या