कोल्हापूर : अंबाबाईच्या श्रीपूजकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण

कोल्हापूर : अंबाबाईच्या श्रीपूजकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच श्रीपूजकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आलीये.

  • Share this:

22 जून : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील श्रीपुजक हटाव आंदोलनाचा आता चांगलाच भडका उडालाय. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच श्रीपूजकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आलीये.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात श्रीपुजकांविरोधात सध्या आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरकरांनी श्रीपूजकांविरोधात जनआंदोलन उभं केलं असून आज (गुरुवार) संध्याकाळी कोल्हापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत आज तोडगा निघतो का याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. पण या बैठकीत आंदोलकांचा भडका उडाला. घागरा चोळी नेसवणाऱ्या श्रीपूजकाला मंदिर बंदी करा अशा घोषणाबाजी करत आंदोलकांनी श्रीपूजक अजित ठाणेकरांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करून या श्रीपूजकाची सुटका केली. अजित ठाणेकर हे भाजपचे नगरसेवक आहे आणि श्रीपूजकही आहे.

दरम्यान, या बैठकीत आंदोलकांच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. पुढील तीन महिन्यात समितीचा अहवाल विधी न्याय विभागाला देण्याचे आदेश या समितीला देण्यात आला. या अहवालावर सरकार तातडीने निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलंय.

First published: June 22, 2017, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading