संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रवादी आमदाराच्या दिशेनं भिरकावल्या पाण्याने भरलेल्या घागरी

संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रवादी आमदाराच्या दिशेनं भिरकावल्या पाण्याने भरलेल्या घागरी

मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे नदी प्रदुषित होत आहे. तेच पाणी प्यावं लागत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी मुश्रीफ यांची वाट अडवली त्यांच्यावर पाण्याच्या घागरी फेकण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

कोल्हापूर, 10 नोव्हेंबर - जिल्ह्यातील कागल मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना शनिवारी आपल्याच मतदारसंघातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे नदी प्रदुषित होत असून, तेच पाणी प्यावं लागत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी मुश्रीफ यांची वाट अडवली त्यांच्यावर पाण्याच्या घागरी फेकण्याचा प्रयत्न केला

कागल तालुक्यातील बेलेवाडी येथे आमदार हसन मुश्रीफ यांचा साखर कारखाना आहे. कारखान्यातून निघणाऱ्या घाण पाण्याची विल्हेवाट थेट नदीच्या प्रवाहात करण्यात आली असल्याने नदीचं पाणी प्रदुषित होत आहे. गावाला याच पाण्याचा पुरवठा होत असल्याने, गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रदुषित पाणी प्यावं लागत असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी आपला रोष व्यक्त केला.

आमदार हसन मुश्रीफ साखर कारखान्याकडे निघाले असताना संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला. यावेळी हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. नदीचं प्रदूषण थांबवा ही मागणी करत असताना काही संतप्त ग्रामस्थांनी पाण्यानं भरलेल्या घागरी भिरकावल्या. या प्रकारानंतर बेलेवाडीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ताबडतोब प्रदूषण थांबवाव अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून,  संतप्त नागरिकांचा रोष पाहून अखेर आमदारांना काढता पाय घ्यावा लागला.

 VIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला

First published: November 10, 2018, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading