Home /News /maharashtra /

ऐन दिवाळीत कोल्हापूरने गमावला सुपुत्र, पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात जवान शहीद

ऐन दिवाळीत कोल्हापूरने गमावला सुपुत्र, पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात जवान शहीद

लॉकडाऊन काळात 120 दिवस गावी राहिल्यानंतर ऋषीकेश जोंधळे हे 11 जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले.

कोल्हापूर, 13 नोव्हेंबर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले आहेत. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली आहे. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे 2018 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ऋषीकेश यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. ते 6 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. लॉकडाऊन काळात 120 दिवस गावी राहिल्यानंतर ऋषीकेश जोंधळे हे 11 जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले. संसार थाटण्याआधीच जगाचा निरोप सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झालेले जवान ऋषीकेश जोंधळे हे अविवाहित होते. राष्ट्रीय खेळाडू असल्याने ते इंडियन आर्मीमध्ये भरती झाले. लहानपणापासून उराशी बाळगलेलं देश सेवेचं स्वप्न पूर्ण झालेलं असतानाच ऋषीकेश यांना वीरमरण आलं. ऐन दिवाळीत आपल्या सुपुत्राला गमावल्याने कोल्हापूरसह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद ऋषीकेश जोंधळे यांचे पार्थिव उद्या रात्री त्यांच्या मूळ गावी आणलं जाईल, अशी माहिती आहे. पाकिस्तानच्या कुरापतीला भारतानेही दिलं प्रत्युत्तर आज पाकिस्तानने (Pakistan) LOC जवळील 3 भागांमध्ये शस्त्रसंघीचं (ceasefire violation) उल्लंघन करीत गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याचे (Indian Army) एक BSF अधिकारी, एक जवान शहीद झाले असून 3 स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत दोन आयल डंप, चार फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सातत्याने फायरिंग सुरू होती. याला प्रत्युत्तर देताना भारतीन सैन्याने प्रत्येक सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं. काश्मीरमधील हाजी पीर तंगधार आणि गुरेज सेक्टरच्या पलीकडे पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या तीन फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या. ज्यामध्ये 6 ते 7 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. याशिवाय 3 कमांडोदेखील या प्रत्युत्तराच्या कारवाईत मारले गेले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Indian army, Kolhapur

पुढील बातम्या