मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Rain in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका कायम 54 मार्गांवरील वाहतूक बंद, शेकडो गावांचा संपर्क तुटला

Rain in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका कायम 54 मार्गांवरील वाहतूक बंद, शेकडो गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर शहर आणि परिसरातील ज्या गावांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे त्या गावांचे स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

कोल्हापूर शहर आणि परिसरातील ज्या गावांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे त्या गावांचे स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

कोल्हापूर शहर आणि परिसरातील ज्या गावांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे त्या गावांचे स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

  कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. (Rain in Kolhapur) मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पाणी पातळी संथ गतीने वाढत असली तरी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 41.8 फुटांवर पोहोचल्याने कोल्हापूरकरांवर महापुराचे सावट कायम आहे. दरम्यान कोल्हापूर शहर आणि परिसरातील ज्या गावांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे त्या गावांचे स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यातील 54 वाहतुकीचे मार्ग बंद झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

  कोल्हापूर जिल्ह्यातील कोकणाकडे जाणारे बऱ्यापैकी रस्ते बंद आहेत. यातील कोल्हापूर-वैभववाडी (करुळ घाटात दरड कोसळल्याने बंद करण्यात आला आहे. तर कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील केर्लीनजीक पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. चिखली-शिंगणापूर, चिखली - वरणगे, निढोरी-गोरंबे, शिरढोण पूल, सोनगे- चिखली. कसबा बावडा- शिये, कदमवाडी- जाधववाडी यासह एकूण 54 मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

  हे ही वाचा : राज्यात पुढचे चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार तर पुणेकरांनाही इशारा

  पंचगंगा धोक्याच्या पातळीजवळ आल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे खुले असून त्यातून 8 हजार 740 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  कोल्हापूर-पन्हाळा मार्ग वाहतुकीसाठी दुसऱ्या दिवशीही बंद राहिला. गुरुवारी कसबा बावडा शिये, कदमवाडी - मार्केट यार्ड हे दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली असून एकूण 54 मार्गावरील वाहतूक बंद आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पावसाने उघडीप दिली. मात्र जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. राधानगरी आणि दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी सात ते सायंकाळी चार या आठ तासांत अतिवृष्टी झाली. राधानगरी परिसरात 90 मि.मी. तर दूधगंगा परिसरात 70 मि.मी. पाऊस झाला. जोरदार पावसाने राधानगरीच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली.

  हे ही वाचा : 5 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेली कार, अन् मग..; पुण्यातील एस एम जोशी पुलावरील थरारक घटनेचा Video

  सर्वच धरणांतून विसर्ग सुरू

  जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी 14 धरणांतून विसर्ग सुरू होता. गुरुवारी तुळशीतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यामुळे सर्वच धरणातून गुरुवारपासून विसर्ग सुरू झाला आहे. वारणा धरणातून 9 हजार 400 तर दूधगंगा धरणातून 4 हजार 772 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

  दहा धरण क्षेत्रात अतिवृष्टी

  मागच्या 24 तासांत प्रमुख 15 धरणांपैकी 10 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. कडवी (57), पाटगांव (60), चिकोत्रा (45), आंबेओहळ (45) व कोदे (57 मि.मी.) या धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला. राधानगरीत 90 मि.मी., तुळशी आणि वारणा परिसरात प्रत्येकी 112 मि.मी., दुधगंगेत 174 मि.मी., कासारीत 87 मि.मी., चित्रीत 120 मि.मी., जंगमहट्टीत 143 मि.मी., घटप्रभेत 135 मि.मी. पावसाची नोंद झाली.

  आजऱ्यात अतिवृष्टी

  जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 26.1 मि.मी. पाऊस झाला. आजऱ्यात अतिवृष्टी झाली. तिथे सर्वाधिक 65 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी तालुक्यात 63 मि.मी. इतका झाला. गगनबावड्यात 55.4, चंदगडमध्ये 52.7, शाहूवाडीत 38.1, भुदरगडमध्ये 32.4, शाहुवाडी 28.7, कागलमध्ये 14.1, गडहिंग्लजमध्ये 12.7, करवीरमध्ये 8.8, हातकणंगले 3.4 तर शिरोळमध्ये 1.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur

  पुढील बातम्या