• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • तुम्ही वैध ट्रॅव्हल्सने प्रवास करता ना? RTOकडून धडक कारवाई

तुम्ही वैध ट्रॅव्हल्सने प्रवास करता ना? RTOकडून धडक कारवाई

आरटीओअंतर्गत अवैध ट्रॅव्हल्सची तक्रार mh09@mahatranscom.in या वेबसाईटवर ट्रॅव्हल्सचे नाव, वाहनाचा क्रमांक, तारीख, वेळ, आपले तिकीट, आपले नाव, पत्ता मोबाईल नंबर यासह करावी

  • Share this:
कोल्हापूर, 30 जानेवारी : RTO ने कोल्हापूरात धडक कारवाई केली आहे. याअंतर्गत RTO ने अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या परराज्यातील तब्बल 11 वाहनांवर कारवाई केली आहे. अशा प्रकारे अवैध प्रवाशी वाहनांमधून प्रवास करणे टाळा, असे आवाहन स्टीव्हन अल्वारीस यांनी केलं आहे. अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या परराज्यांतील 11 वाहनांवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आल्याची माहिती  प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली आहे. कारवाई करण्यात आलेल्या 11 वाहनांमध्ये AR 01 J 5686, AR 02 6051, AR 01 J 3007, NL 01 B 1814, NL 01 B 1767, NL 01 B 1617, GJ 05 BV 6932, GJ 14 Z 7002, AR 01 J 4981, AR 20 6666, AR 02 6051 या वाहनांचा समावेश आहे. अवैध बांधणी असणाऱ्या बसमधून प्रवास टाळा असा सल्ला डॉ. अल्वारिस यांनी दिला आहे. अरुणाचल प्रदेश (AR), नागालँड (NL), गुजरात (GJ) इत्यादी राज्यांमध्ये नोंदणी झालेल्या अवैध बसेस कोल्हापूरमध्ये आढळून आल्या आहेत. या बसेस महाराष्ट्राचा कर भरत असल्या तरी त्या वाहनांची लांबी प्रमाणापेक्षा जास्त आहे. वाहनाचा ओवर हँग जास्त आहे. वाहनांमध्ये 32 च्या ठिकाणी 36 स्लीपर आहेत. करिता सदर वाहनांची बांधणी नियमबाह्य आहे. असा प्रवास करणे धोकादायक असून प्रवाशांनी अशा वाहनांतून प्रवास करू नये, असे आवाहन डॉ. अल्वारीस यांनी केले. अशा नियमबाह्य प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आररटीओ विभागाने कारवाई सुरू केली असून कारवाईला घाबरून बस मालकांनी सदर वाहने रस्त्यावर आणणे बंद केले आहे. या वाहनांचे फिटनेस रद्द करण्यात आले असून  कारवाई झालेल्या वाहनांमध्ये वैभव ट्रॅव्हल्स,  एम बी लिंक, परिक ट्रॅव्हल्स, संगीता, सनराइज, हर्षाली, नॅशनल ट्रॅव्हल्सचा इत्यादींचा समावेश आहे. प्रवाशांनी आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक तपासावा व सदर नोंदणी क्रमांक AR, NL,GJ असा असेल तर अशा वाहनातून प्रवास करू नये आणि आरटीओ कार्यालयाला  mh09@mahatranscom.in या वेबसाईटवर ट्रॅव्हल्स चे नाव, वाहनाचा क्रमांक, तारीख, वेळ, आपले तिकीट, आपले नाव, पत्ता मोबाईल नंबर  यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ अल्वारिस यांनी केले आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: