• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठी रस्सीखेच, 3 मंत्री आणि 5 आमदार सत्तेला सुरुंग लावण्यासाठी उतरले मैदानात

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठी रस्सीखेच, 3 मंत्री आणि 5 आमदार सत्तेला सुरुंग लावण्यासाठी उतरले मैदानात

Kolhapur : गोकुळ दूध संघाची निवडणूक (Gokul Dudh Sangh elections) जाहीर झाली आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 27 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक (Gokul Dudh Sangh elections) जाहीर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाही राजकीय नेत्यांसह आमदार, खासदार आणि मंत्रीही ठराव गोळा करण्यासाठी झटत असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता सध्या जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. त्यामध्ये ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा समावेश आहे. सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात पाहायला मिळत असून याच रणधुमाळीमध्ये तिन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासोबतच 5 विद्यमान आमदारही विरोधी म्हणजेच शाहू आघाडीत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला सुरुंग लागणार का, याचीच चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला दूध संघ आणि याच दूध संघाच्या संचालकपदासाठी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत मोठी चढाओढ असते. अजून अधिकृतपणे उमेदवार जरी जाहीर करण्यात आले नसले तरी गोकुळ दूध संघाची सत्ता असणाऱ्या महाडिक घराण्याविरोधात तीन विद्यमान मंत्री आणि पाच आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गोकुळ दूध संघाचे किंगमेकर समजलं जातं .त्यांच्यासोबतच त्यांचा मुलगा माजी आमदार अमल महाडिक आणि माजी खासदार धनंजय महाडिक या महाडिक घराण्यातील 3 नेत्यांकडे गोकुळ दूध संघाची धुरा सांभाळली जात आहे. हेही वाचा - भाजपने कोंडी केली असताना महाविकास आघाडीत नवा वाद, Shivsena-Congress आमने सामने या दूध संघाच्या निवडणुकीत गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणार्‍या दूध संस्थांच्या ठरावाला मोठे महत्त्व असतं. त्यामुळे विद्यमान मंत्री आणि आमदार मोठी ताकद वापरून हे ठराव गोळा करत आहेत. काही गटांमार्फत यापूर्वीच हे ठराव गोळा करण्यात आले आहेत. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाल्याने काही राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अर्ज न्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा सुपुत्र वीरेंद्र मंडलिक, शेकापचे कार्यकर्ते बाबासाहेब देवकर यांच्यासह दिग्गज कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये बंटी विरुद्ध मुन्ना अर्थातच सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना पाहायला मिळाला आहे. पण या निवडणुकीत तब्बल तीन विद्यमान मंत्री आणि पाच आमदार विरुद्ध महाडिक घराणं आणि सत्ताधारी गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. येत्या 2 मे रोजी गोकुळ दूध संघसाठी मतदान होणार असून 4 मे या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल विद्यमान मंत्री आणि आमदारांच्या अंगावर पडणार की पुन्हा सत्ताधारीच गुलालात न्हाऊन निघणार हे 4 मे या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published: