• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • विरोधी गटातील आमदार-मंत्री आमच्या संपर्कात, गोकुळच्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट

विरोधी गटातील आमदार-मंत्री आमच्या संपर्कात, गोकुळच्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट

गोकुळ दूध संघावर महाडिक घराण्याची आणि त्यांच्या त्यांच्या संचालकांची सत्ता आहे.

  • Share this:
 कोल्हापूर, 05 एप्रिल : कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात सध्या गोकुळ निवडणुकीचं (kolhapur gokul dudh sangh election 2021) वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विद्यमान संचालक, आणि विरोधक पायाला भिंगरी बांधून गाठीभेटीवर भर देत आहेत आणि या निवडणुकीची धांदल ही सगळी सुरू असतानाच गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके (Arun Narke) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  विरोधी गटातील मंत्री आमदार त्यांच्या मनाप्रमाणे जर नाही झालं तर ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात, असा गौप्यस्फोट नरके यांनी केला आहे. गोकुळ दूध संघावर महाडिक घराण्याची आणि त्यांच्या त्यांच्या संचालकांची सत्ता आहे. त्याविरोधात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री म्हणजेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जवळपास पाच विद्यमान आमदार हे सत्ताधार्‍यांच्या विरोधात आहेत. पण अरुण नरके यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे गत वेळच्या निवडणुकीची आठवण कोल्हापूरकरांना होत आहे. दिशा पटानी कशी झाली इतकी Fit & Fine; सांगितलं आपल्या Fitnessचं रहस्य मागील निवडणुकीत अशाच पद्धतीने विरोधकांची मोट बांधण्यात आली होती. मात्र, त्यातील काही नेते  सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागले होते त्यामुळे भुतकाळातील निवडणुकीची पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार का, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. येत्या 2 मे रोजी गोकुळ दूध संघासाठी मतदान होणार असून 4 मे या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संचालकांसह विरोधकांचा जोरदार प्रचार सुरू असतानाच आता नरके यांनी केलेल्या गौप्यस्फोटमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नरके यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नेमके कोण मंत्री आणि आमदार सत्ताधार्‍यांच्या गळाला लागणार याचीही उत्सुकता राजकारणात शिगेला पोचली आहे. 49 रन्सवर कॅच घेतला म्हणून फलंदाजाने फील्डरला केली जबरी मारहाण,खेळाडू गंभीर जखमी दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सध्या सत्ता आणि ताकद असल्याने त्यांच्याकडून बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी टीकाही अरुण नरके यांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या निवडणुकीचं वातावरण अजूनही तापणार यात शंका नाही.
Published by:sachin Salve
First published: