अंबाबाईच्या चरणी 26 किलो सोन्याची पालखी

अंबाबाईच्या चरणी 26 किलो सोन्याची पालखी

या कार्यक्रमाला देशातल्या 3 आद्यपीठांचे शंकराचार्य उपस्थित होते.

  • Share this:

02 मे :  कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. पालखीसाठी 26 किलो सोन्याची गरज असल्यामुळं देवीच्या भक्तांनाही सोन दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. गेल्या 2 वर्षांपासून या पालखीचं काम सुरु होतं. काही दिवसांपूर्वीच मंदिर परिसरात या पालखीची विधीवत पुजाही करण्यात आली होती. त्यानंतर आता पालखी ट्रस्टनं ही पालखी देवीच्या चरणी अर्पण केली आहे.

या कार्यक्रमाला देशातल्या 3 आद्यपीठांचे शंकराचार्य उपस्थित होते. त्यामध्ये तामीळनाडूतल्या कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती आणि आंध्रप्रदेशातील मंत्रालयम मधल्या राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश सुबुयेंद्रतीर्थ यांचा समावेश होता.

सुवर्णपालखीसाठी साडेबावीस किलो सोने लागले. त्यासाठी सुमारे 19 हजार भाविकांकडून 26 किलो सोनं देणगी स्वरूपात मिळालं होतं. या पालखीसाठी एकूण आठ कोटींचा खर्च आला.

गेल्या अनेक दिवसांपासून अंबामातेच्या भक्तांमध्ये या पालखी बाबत उत्सुकता होती. पण आता ही पालखी देवीच्या चरणी अर्पण झाल्यानं भक्तांची प्रतिक्षा  संपली असून मंदिराच्या शिरपेचातही आता एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

First published: May 2, 2017, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading