मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : कोल्हापुरात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी, 100 घरांवर जोरदार दगडफेक

VIDEO : कोल्हापुरात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी, 100 घरांवर जोरदार दगडफेक

हाणामारी आणि दगडफेकीत 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 8 जण गंभीर जखमी

हाणामारी आणि दगडफेकीत 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 8 जण गंभीर जखमी

हाणामारी आणि दगडफेकीत 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 8 जण गंभीर जखमी

कोल्हापूर, 16 मार्च : दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारी दरम्यान दोन्ही गटांतील लोकांनी तुफान दगडफेक केली. गटात लोखंडी रॉड, लोखंडी, पाईप, दगड जे मिेळेल ते हातात घेऊन एकमेकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात घडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण असून सध्या या गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे. 200 हून अधिक पोलीस गावात तैनात करण्यात आले आहेत. या दगडफेकीमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी 80 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे वाचा-दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवलं, हत्येनंतर डोकं कापून नदी फेकलं या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर जखमींवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चिपरी गावात गावडे आणि कांबळे यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून वाद सुरु होता. दरम्यान रविवारी सकाळी घोडावत फॅक्टरीजवळ किरकोळ भांडण झालं. किरकोळ वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. एकमेंकांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, दगड, काठ्या यासह साहित्य वापरून दोन्ही गट भिडले. यामध्ये साधारण 100 घरांवर दगडफेक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हाणामारीत चिपरीतील दोन गटांतील सुमारे शंभरहून अधिक घरांवर दगडफेक करुन मोठं नुकसान करण्यात आलं आहे. दोन्ही गट हातात मिळेल ते साहित्य घेऊन एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले होते. या हाणामारीत दोन पोलीसांसह 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे वाचा-विवाहितेचं पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी जुळलं सूत, पिता-पुत्रानं असा काढला काटा
First published:

Tags: Kolhapur, Kolhapur crime, Kolhapur news

पुढील बातम्या