नात्याला काळीमा !,नराधम बापाकडून सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार

नात्याला काळीमा !,नराधम बापाकडून सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार

गेल्या 8 महिन्यांपासून बापाकडून या मुलीचा लैंगिक छळ सुरू होता आणि याबाबत कोल्हापूरच्या शाहुपुरी पोलीस ठाण्यात आरोपी लिहाज मुजावरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

03 जुलै : कोल्हापूरमध्ये एका नराधम बापानं आपल्याचं सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. गेल्या 8 महिन्यांपासून बापाकडून या मुलीचा लैंगिक छळ सुरू होता आणि याबाबत कोल्हापूरच्या शाहुपुरी पोलीस ठाण्यात आरोपी लिहाज मुजावरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोल्हापूर शहरात पीडित महिला राहते तिचं दुसरं लग्न झालंय. त्यानंतर तिच्या दुसऱ्या पतीकडून म्हणजे लिहाज मुजावरनं आपल्याच सावत्र मुलीवर अत्याचार केलेत. पीडित मुलीचं वय 6 वर्ष आहे. याबाबत महिलेनं आरोपीला जाब विचारल्यावर त्यानं नकार दिला पण महिलेनं त्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर आरोपी लिहाज हा फरार झालाय.

अल्पवयीनं मुलीवर या घटनेचा परिणाम झाला असून तिनं शाळेत जाणंही बंद केलंय. तसंच महिलेलाही सध्या आरोपी हा दबाव टाकत असून राजकीय नेत्यांकडूनही धमक्या येत असल्याचं या पीडित महिलेनं आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय. सध्या पोलीस या नराधम बापाचा शोध घेत असून या नराधम पतीनं महिलेकडून लाखो रुपयेही उकळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 06:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading