• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पोटच्या मुलासह पाण्यात उडी घेऊन आई-वडिलांची आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

पोटच्या मुलासह पाण्यात उडी घेऊन आई-वडिलांची आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

पती-पत्नीने आपल्या मुलासह सामुहिक आत्महत्या (Suicide News) केल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 16 एप्रिल : संपूर्ण राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेकांना हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना आंदोलन करावं लागत आहे आणि त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांचं आर्थिक गणितही विस्कटलं आहे. त्यामुळेच अनेक जण सध्या टोकाचं पाऊल उचलत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या (Kolahpur District) पन्हाळा तालुक्यात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पती पत्नीने आपल्या मुलासह सामुहिक आत्महत्या (Suicide News) केल्याचं समोर आलं आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी नदीपात्रात तिघांचे मृतदेह सापडले असून आई-वडिलांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला दोघांच्यामध्ये दोरीने बांधून कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे, त्यानंतर पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोठे गावातील दीपक शंकर पाटील वय 40, वैशाली दीपक पाटील वय 35 यांनी आपला 14 वर्षीय मुलगा विघ्नेश याला आपल्याबरोबरच एकत्र दोरीने बांधून घेऊन कुंभी नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना उघड होताच संपूर्ण गाव नदीत पात्राकडे धावला. गोठे गावात आपले वडील, पत्नी आणि दोन मुले यासह राहत असलेले दीपक पाटील हे शेती व्यवसाय करीत होते. या बरोबरच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करीत होते. घरी खाऊन पिऊन सुखी असलेल्या या कुटुंबाच्या आत्महत्येने संपूर्ण कळे परिसर हळहळला. त्यांची 16 वर्षाची मुलगी मामाच्या गावी गेल्यामुळे या घटनेतून बचावली. सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं? दीपक पाटील यांनी आत्महत्येपूर्वी घरात सुसाईड नोट लिहून ठेवली आहे .यामध्ये जीवनात अयशस्वी झालो आहे. आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरु नये. वडिलांना आणि मुलीला सांभाळा असा मजकूर लिहिला आहे. याबाबतची वर्दी कळे पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील सपोनि प्रमोद सुर्वे यांच्यासह येवून तपासाबाबत सूचना दिल्या. मात्र नेमकं आत्महत्यचं कारण काही समजू शकले नाही. हेही वाचा - आईची एक चूक भोवली, 2 दिवसाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण; अथक प्रयत्नांनंतरही झुंज अपयशी काल रात्री घरातून अकरा वाजता बाहेर पडल्यानंतर या तिघांचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेण्यात आला. पण बाहेर कुठेतरी गेले असतील असं समजून नातेवाईक झोपून गेले. मात्र आज सकाळी थेट कुंभी नदीच्या पात्रात या तिघांचा मृतदेह एकाच ठिकाणी आढळला, हे मृतदेह बाहेर काढतानाही पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. कारण तिन्ही मृतदेह एकमेकांना बांधून ठेवण्यात आले होते. दरम्यान, या घटनेबद्दल पन्हाळा तालुक्‍यात हळहळ होत असून असं टोकाचं पाऊल पाटील दाम्पत्याने उचलायला नको होतं, अशीही चर्चा नागरिक करत आहेत. तसंच या घटनेमुळे गोठे-कळे परिसरासह पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: