मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सीमाभागात आंदोलनाची धग कायम, पण वादग्रस्त झेंडा काढणार कधी?

सीमाभागात आंदोलनाची धग कायम, पण वादग्रस्त झेंडा काढणार कधी?

Kolhapur Agitation : वादाची किनार असलेला वादग्रस्त ध्वज कधी काढला जाणार याबाबत मात्र बेळगाव जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

Kolhapur Agitation : वादाची किनार असलेला वादग्रस्त ध्वज कधी काढला जाणार याबाबत मात्र बेळगाव जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

Kolhapur Agitation : वादाची किनार असलेला वादग्रस्त ध्वज कधी काढला जाणार याबाबत मात्र बेळगाव जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

कोल्हापूर, 13 मार्च : बेळगावसह (Belgaum) सीमाभाग आणि कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सध्या मराठी आणि कन्नड हा वाद उफाळून आला आहे. अनेक संघटना,पक्ष आंदोलन करत आहेत, पण या सगळ्या आंदोलनाची आणि वादाची किनार असलेला वादग्रस्त ध्वज कधी काढला जाणार याबाबत मात्र बेळगाव जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे झालाच पाहिजे, असं म्हणत मराठी भाषिक आजही सीमाभागात कानडी अत्याचार सहन करत आहे आणि यातच भर म्हणून दोन महिन्यांपूर्वी कन्नड रक्षण वेदिका या संघटनेने बेळगाव महापालिकेसमोर वादग्रस्त लाल-पिवळा ध्वज उभा केला. हा ध्वज काढण्याची मागणी मराठी भाषिकांची आहे, किंवा त्या ध्वजा शेजारी मराठी अस्मिता असलेला आमचा भगवा ध्वज उभा करण्याची परवानगी द्या असं महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक म्हणत आहेत, पण याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

या वादग्रस्त झेंड्याविरोधात यापूर्वी दोन वेळा मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. पण दोन्ही वेळेला वेगवेगळी कारणे देत या मोर्च्याला परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही 8 मार्चला पोलिसांची परवानगी मिळालेली नसताना मराठी भाषिकांनी मोर्चा काढला खरा, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन झेंड्याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्याला आठ दिवस उलटले तरीही अजून हा झेंडा जैसे थेच आहे आणि यामुळेच आजही कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं कर्नाटक विरोधात आंदोलन केलं.

हेही वाचा - आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेलचालकांना दिला शेवटचा इशारा

कागल जवळील आरटीओ चेक पोस्टवर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक पासिंगच्या गाड्या महाराष्ट्राच्या हद्दीत सोडू नयेत असं निवेदन शिवसेनेकडून आरटीओ प्रशासनाला देण्यात आलं. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने राष्ट्रीय महामार्गावर उपस्थित होते, तर दुसरीकडे कर्नाटक महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील बस सेवा पूर्णपणे बंद आहे. कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यांमधून बेळगाव धारवाड हुबळी बंगळुरू या ठिकाणी जाणारी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक राज्य सरकारनेही महाराष्ट्रात येणाऱ्या सगळ्या बसेस बंद केल्या आहेत.

हे सगळं आंदोलन ज्या वादग्रस्त झेंड्याविरोधात सुरू आहे त्या झेंड्याबाबत अद्याप बेळगाव जिल्हा प्रशासन काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे अजूनही तणावाची आणि आंदोलनाची परिस्थिती सीमाभागात कायम राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत वादग्रस्त ध्वज काढला जात नाही तोपर्यंत मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती गप्प बसणार नाही. त्यामुळे नेमका झेंडा कधी काढला जातो याकडे संपूर्ण सीमाभागाचं लक्ष लागून आहे.

दुसरीकडे, येत्या काही दिवसांमध्ये बेळगावची लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यामुळे बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे, तसंच बेळगाव महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कन्नड रक्षण वेदिका या संघटनेला राजकीय पक्ष पाठीशी घालत असल्याचे चित्र सीमाभागात पाहायला मिळत आहेत.

First published:
top videos

    Tags: Belgaum, Kolhapur