मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जावयाच्या चाकू हल्ल्यात सासरा ठार, सासू आणि पत्नी गंभीर जखमी

जावयाच्या चाकू हल्ल्यात सासरा ठार, सासू आणि पत्नी गंभीर जखमी

जावई अनिल पाटील यानं आपल्या पत्नीसह सासू - सासऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सासरे धोंडीराम रावण जागीच ठार झाले. तर सासू राधा रावण, पत्नी रूपाली पाटील गंभीर जखमी झालेत.

जावई अनिल पाटील यानं आपल्या पत्नीसह सासू - सासऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सासरे धोंडीराम रावण जागीच ठार झाले. तर सासू राधा रावण, पत्नी रूपाली पाटील गंभीर जखमी झालेत.

जावई अनिल पाटील यानं आपल्या पत्नीसह सासू - सासऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सासरे धोंडीराम रावण जागीच ठार झाले. तर सासू राधा रावण, पत्नी रूपाली पाटील गंभीर जखमी झालेत.

    संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 17 सप्टेंबर : इचलकरंजीमध्ये कौटुंबिक वादातून हल्ल्याची घटना घडलीय. जावई अनिल पाटील यानं आपल्या पत्नीसह सासू - सासऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सासरे धोंडीराम रावण जागीच ठार झाले. तर सासू राधा रावण, पत्नी रूपाली पाटील गंभीर जखमी झालेत.रूपाली आपल्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती. तिथे येऊन अनिल पाटीलनं हे  कृत्य केलं.

    या हल्ल्यातून छोटी मुलगी थोडक्यात बचावली आहे. आरोपी अनिल पाटील हा फरार आहे. इचलकरंजीच्या जवाहरनगरमधल्या कोरवी गल्लीत ही घटना घडलीय. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली गेलीय.

    कौटुंबिक वादातून घडणाऱ्या अशा घटना आता चिंतेचा विषय बनल्यात. क्षुल्लक गोष्टीवरून संताप वाढतो आणि त्याचं परिवर्तन कौर्यात होतं. आताही रागाच्या भरात अनिल पाटीलनं हे कौर्य केलं आणि तो फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    हल्ली कुटुंबातच आपल्या माणसांवर हल्ला करण्याच्या घटना घडतायत. माणसं नाती विसरतायत. काही दिवसांपूर्वी देवाची अती भक्ती केल्याचा राग आल्याने पोटच्या मुलानेच आपल्या आईच्या गळ्यात चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या शिरगांव शिंदे आळी भागात हा प्रकार घडला आहे.

    सुनीता धेंडे या आपला मुलगा आकाश धेंडे याच्यासोबत राहतात. सुनीता यांच्या घरी देव्हारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपूजा करायच्या. पण आपली आई सतत देवदेव करत असल्यामुळे त्याचा राग मुलगा आकाशला येत होता. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्या भांडणात संतापलेल्या आकाशने आई सुनिता हिच्या गळयात धारदार चाकू खुपसून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

    भाजप खासदाराचे पाय धुऊन कार्यकर्त्यांनी प्यायले पाणी, VIDEO व्हायरल

    First published:

    Tags: Anil patil, Crime, Killed, Kolhapur, Son in law