मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! कोल्हापुरातील रुग्णालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव

धक्कादायक! कोल्हापुरातील रुग्णालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव

या रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना आग लागली.

कोल्हापूर, 28 सप्टेंबर : मुंबई-पुण्यानंतर कोरोनाचा विळखा कोल्हापुरात अधिक घट्ट होत असल्यानं नागरिकांमध्ये आधीच भीती असताना आता आणखीन एक मोठं संकट ओढवलं. सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग लागली आहे. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये धूर आणि लोळ उठले होते. सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आग लागल्याची ही घटना सोमवारी पहाटे घडली. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. कोल्हापूरमधल्या सीपीआर शासकीय रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे आग लागली होती आता ही आग आटोक्यात आली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. हे वाचा-जेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री या रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना आग लागली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पहाटे सीपीआर रुग्णालयात जाऊन घटनास्थळाची पहाणी केली. तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात लागलेली आग यामुळे रुग्णांचा मनात भीतीचं वातावरण असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:

Tags: Coronavirus, Kolhapur, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या