...अन् चंद्रकांत पाटील जिंकले,नांगरे पाटील हरले

मंत्रिगट नेते आणि पोलीस यांच्यात रस्सीखेच असा सामना कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला.

मंत्रिगट नेते आणि पोलीस यांच्यात रस्सीखेच असा सामना कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला.

  • Share this:
11 नोव्हेंबर : राजकारणामध्ये अनेक नेते-कार्यकर्ते एकमेकाला खाली खेचत असतात..बाजूला सारत असतात...पण राज्याच्या एका मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच एक खेळ खेळत त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला..आश्चर्य वाटलं ना..पण होय हा खेळ पाहायला मिळाला कोल्हापूरमध्ये.. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यातला हा खेळ होता.  45 परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा कोल्हापूरमध्ये पार पडली. या स्पर्धेचा शेवटचा सामना झाल्यानंतर मंत्रिगट नेते आणि पोलीस यांच्यात रस्सीखेच असा सामना कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला. विशेष म्हणजे हा सामना जिंकला तो महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गटाने. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या दादा जिंकले आणि पोलीस हरले अशी खुमासदार चर्चा होताना पाहायला मिळते. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भाजपचे आमदार अमल महाडिक आणि म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे होते तर पोलीस गटात आयजी विश्वास नांगरे पाटील आणि पोलीस अधिकारी होते. कायम पोलीस फिट असल्याची चर्चा असते. मात्र, या मंत्रिगटाने पोलिसांपेक्षा आपणच फिट असल्याचे दाखवून दिले हे मात्र नक्की..
First published: