पेटलेली एसटी बस आपोआप चालली, हायवे सोडून बाजूला झाली !

पेटलेली एसटी बस आपोआप चालली, हायवे सोडून बाजूला झाली !

बस काही फूट पुढे सरकली आणि रस्त्याच्याकडेला जाऊन उभी राहिली. त्यानंतर संपूर्ण बस जळून खाक झाली.

  • Share this:

10 फेब्रुवारी : कोल्हापूरमध्ये आज एका एसटी बसला आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. पण धक्कादायक म्हणजे पेटलेली बस ड्रायव्हरविना आपोआप काही अंतर चालली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली.

घडलेली हकीकत अशी की,  कोल्हापूरहुन गारगोटीला जाणारी एसटी बस हणबरवाडी घाटात आल्यानंतर या गाडीच्या बोनेटमधून अचानकपणे धूर येऊ लागला आणि बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला.चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानाने प्रवाशांना त्वरित बसमधून खाली उतरवल्यामुळे जीवितहानी टळली आहे. त्यामुळे   या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांच्या साहित्यच मात्र मोठे नुकसान झालंय.

धक्कादायक म्हणजे जेव्हा बस पूर्णपणे पेटलेली होती. तेव्हा ती आपोआप चालायला लागली. बस काही फूट पुढे सरकली आणि रस्त्याच्याकडेला जाऊन उभी राहिली. त्यानंतर संपूर्ण बस जळून खाक झाली. एखाद्या हाॅरर सिनेमात घडावा तसा हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय. एखाद्यावेळेस बसचा गिअर पडल्यानंतर ही बस पुढे गेली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पण पेटती बस पुढे जाताना पाहुन उपस्थितांची एकच भंबेरी उडाली.

दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे एस टी बस ला आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published: February 10, 2018, 6:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading