कोल्हापूर, 16 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Case) आणि पोलीस अधिकारी सचिन वाजे यांची अटक या कारणांमुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण राठोड यांच्यानंतर अजून राज्य सरकारमधील आणखी 2 मंत्री राजीनामा देणार (Two more ministers in Thackeray government will resign) असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी कोल्हापूरमधल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे नेमकं राज्याच्या राजकारणात काय घडणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
'पोलीस अधिकारी सचिन वाजे प्रकरणाची मूळं लांबपर्यंत गेली असून सरकार तुमचं असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसं काय करत आहेत,' असा प्रतिसवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरूनही राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाचा अवमान करीत असल्याचा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात लवकर निर्णय लागावा यासाठी सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. एमपीएससी परीक्षा आणि नोकर भरती लांबणीवर पडल्यामुळे त्याचा मराठा समाजावर परिणाम होत असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला विश्वासात घेऊन भरती सुरू करू असे समजावून सांगितले पाहिजं, असा सल्लाही राज्य सरकारला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांनी आणखी एका मुद्द्यावरून सरकारला घेरलं, थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेत केला आक्रमक सवाल
दुसरीकडे, साष्ट पिंपळगावमध्ये सुरू असणारं मराठा आंदोलन चिरडण्याचा निषेध करत जर आंदोलन जबरदस्तीने संपवायचा प्रयत्न झाला तर ते आणखी मोठे आंदोलन होईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांवर दररोज टीका करणारे असे राज्यकर्ते पाहिले नसल्याचा पलटवार केला आहे. पवार यांनी इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाही असं वक्तव्य केलं होतं, त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सीमाप्रश्नाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारने याबाबत पुढाकार घेतला पाहिजे आणि सीमाप्रश्न सुटण्यासाठी जे जे प्रयत्न करायला हवेत ते एकत्रितपणे करायला हवेत, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.