Home /News /maharashtra /

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा RBI कडून परवाना रद्द, ठेवीदारांमध्ये खळबळ

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा RBI कडून परवाना रद्द, ठेवीदारांमध्ये खळबळ

21 राज्यात RBI करणार सर्वे

21 राज्यात RBI करणार सर्वे

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण 13 शाखा आहेत. 100 कोटीपर्यंत ठेवी पोहचल्या होत्या.

    कोल्हापूर, 25 डिसेंबर : कराड जनता सहकारी बँकचा परवाना रद्द करण्याची घटना ताजी असताना आता कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा (Subhadra Local Area Bank)बँकिंग परवाना (License Cancelled)  रिझर्व्ह बँकेनं  (Reserve Bank of India) रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेने सुभद्रा बँकेवर गेल्या दोन महिन्यांपासून व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतर आता धडक कारवाई केली आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेवर महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली होती.   कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण 13 शाखा आहेत. 100 कोटीपर्यंत ठेवी पोहचल्या होत्या. मात्र,  गेल्या दोन वर्षात अनेकांनी ठेवी काढून घेतल्या. सध्या बँकेत एकूण 40 ते 50 कर्मचारीच काम करत आहेत. 2003 च्या सुमारास उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना केली होती. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं कारवाई करत ठेवीदारांचे पैसे परत देता येईल इतकी मालमत्ता असल्याची माहिती पत्रात दिली आहे. याच महिन्यात 9 डिसेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला होता. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यातील उत्पन्नाची कमकुवत शक्यता लक्षात घेता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला  होता. 2017 मध्ये कराड शहर पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर 6 ऑगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांनंतर कराड जनता सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. बँकेबाबत अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ही बँकिंग परवाना रद्द करण्याची कारवाई केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या