कोल्हापूर आणि सांगलीकरांना तुर्तास दिलासा, पण पुराचा धोका कायम

कोल्हापूर आणि सांगलीकरांना तुर्तास दिलासा, पण पुराचा धोका कायम

पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 78 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 17 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे महापुराचे संकट घोंघावत होते पण आता हे संकट तुर्तास टळले आहे.  कर्नाटकमधील अलमट्टी धरणामधून पुन्हा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळीही कमी होत आहे.

अलमट्टी धरणातून 1 लाख 80 हजार क्युसेक वेगानं आधी विसर्ग होत होता, आता हा वेग 2 लाख 20 हजार क्युसेकवर नेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नद्यांची पाणीपातळी कमी होण्यास मदत होणार आहे.

लॉकडाउनच्या मंदीत भामट्यांची संधी, घरात छापल्या 2000 च्या नोटा, पुण्यातच वापरल्या

पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 78 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे सध्या उघडले असून या धरणातून पंचगंगा नदीमध्ये 7 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणातून विसर्ग वाढवला

तर सांगलीत कोयना धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पूर पट्ट्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 32 फुटांवर पोहोचली आहे. कृष्णेचं पाणी शहरातील सुर्यवंशी प्लॉटमधील 4 घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे सूर्यवंशी प्लॉट मधील 10 कुटुंबातील 40 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्तलांतर करण्यात आले आहे.

मुलांनी बापाचे पार्थिव नेले सायकलवर अन् अख्खे गाव फक्त पाहत होते!

कोयना धरणातील पाणीसाठा 92 टीएमसीवर गेला आहे. धरणात पाण्याची आवक 85 हजार क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने होत आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे 10 फुटांवर गेले आहे. तर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग 54 हजार क्युसेक वेगानं होत आहे.

गडचिरोलीत पूर परिस्थिती

तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये पूर परिस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम आहे. पर्लकोटा नदीचा पुर न ओसरल्यानं शंभर गावासहीत भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेलाच आहे.

Published by: sachin Salve
First published: August 17, 2020, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading