कोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी

कोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले फाटा इथं कंटेनर आणि संजय घोडावत स्कूल बसची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 26 जून : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माले फाटा इथं कंटेनर आणि संजय घोडावत स्कूल बसची जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण ठार, तर २६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली असून जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता कोल्हापूरहून संजय घोडावत स्कूल अतिग्रे इथं विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला सांगलीहून कोल्हापूरकड जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.

यामध्ये कंटेनर दुभाजक पास करून विरुध्द दिशेला आला. त्यामुळे अतिग्रेकडे जाणाऱ्या बसच्या ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला. प्रसंगावधान साधून त्यान अपघात होणार हे लक्षात येताच बस रस्त्याजवळील शेतात वळवली. तरीही कंटेनरची जोरदार धडक बसली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील ड्रायव्हर क्लिनरसह २६ विद्यार्थी जखमी झाले.

दरम्यान, पावसाळ्यामुळे रस्ते हे निसरडे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून कोणतेही स्टंट किंवा गाडी वेगात चालवू नका त्याने असे अपघात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

वडाळ्यात इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळल्यामुळे दोस्ती बिल्डर्सच्या विरोधात गुन्हा दाखल

आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

मफतलाल समूहाच्या विशाद मफतलाल यांनी मुंबईत घेतलं 89 कोटींचं घर !

 

 

First published: June 26, 2018, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading