कोल्हापूर, 11 नोव्हेंबर : कोल्हापूरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. इथं टेनिस बॉल मधून गांजा पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहचवण्याचा इऱादा असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्यांदाच कारागृहात गांजा पुरवणाऱ्या टोळीचा पदार्फाश झाला आहे.
गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. तीन संशियत तरुण टेनिस बॉल कापून त्यात गांजा भरत असत. कापलेले टेनिस बॉल पुन्हा चिटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा प्लॅन उधळून लावला.
वाचा-20 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप
वाचा-दाम्पत्याला भाड्याने दिलं होतं घर; 3 दिवसांनंतर घराचं दार उघडताच घरमालक हादरला
पोलिसांनी या कारवाईत कापून पुन्हा चिकटवलेले टेनिस बॉल आणि 15 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तर या प्रकरणी वैभव कोठारी,संदेश देशमुख आणि अमित पायगुडे असा तीन संशतियांना अटक केली आहे. तिघेही संशतिय पुण्याचे असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच, याआधीही कारागृहात गांजा पोहचवला गेला होता का? याचा शोध सुरू आहे.