20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपवलं जीवन, आत्महत्येचं कारण समोर

20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपवलं जीवन, आत्महत्येचं कारण समोर

ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 17 जुलै : कोल्हापूरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.

ऐश्वर्या पाटील ही तरुणी बी फार्मसीचा अभ्यास करत होती. मात्र सध्या कॉलेज बंद असल्याने तिने पाच-सहा दिवसांपूर्वी ऑनलाइन अभ्यास सुरू केला होता. मात्र हा अभ्यास समजत नसल्याने ती काही दिवसांपासून नैराश्यात होती. याच नैराश्यातून गुरुवारी रात्री घऱी कोणी नसल्याचे पाहात तिने घरातील फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

ऐश्वर्याच्या कुटुंबातील सदस्य घरी आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. कुटुंबियांनी तातडीने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा - चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा केला हट्टा, 7 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या

उच्चशिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऐश्वर्याच्या मृत्यूने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसंच 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येनं परिसरातही शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद करवीर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: July 17, 2020, 10:32 AM IST

ताज्या बातम्या