मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतातील कामासाठी बाप-लेक सोबत गेले, पण घरी येण्याआधीच काळाने घातला घाला

शेतातील कामासाठी बाप-लेक सोबत गेले, पण घरी येण्याआधीच काळाने घातला घाला

बापलेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बापलेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बापलेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • Published by:  Akshay Shitole
कोल्हापूर, 26 एप्रिल : शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या बापलेकांवर काळाने घाला घातल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. वीजेच्या तारेचा धक्का लागल्याने पन्हाळा तालुक्यातील माले इथं दोघांचा मृत्यू झाला आहे. बाबासाहेब पाटील आणि राजवर्धन पाटील असं मृतांची नावं आहेत. आज सकाळी 8.30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. बाबासाहेब पाटील हे आपला मुलगा राजवर्धन याच्यासोबत वैरण आणण्यासाठी सकाळी आपल्या शेतात गेले. मात्र हे काम करत असताच शेतात असलेल्या वीजेचा तारेचा या दोघांना धक्का लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेतातील कामासाठी गेलेले दोघेही बऱ्याच वेळानंतर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली. बापलेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी वीजेच्या धक्क्याने चिमुकल्याचाही घेतला होता बळी घरात खेळता-खेळता 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी घडली होती. अंबड तालुक्यातील एकलहेरा येथे पत्र्याच्या घरात करंट उतरल्याने वीजेच्या धक्क्याने एका 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेही वाचा - डोळ्यांमध्ये तब्बल 21 दिवस राहू शकतो कोरोना, धोकादायक व्हायरसबद्दल नवी माहिती उघड बबलू महादेव भगत असे या मयत झालेल्या बालकाचे नाव होतं. महादेव भगत हे ऐकलहेरा गावात एका पत्र्याच्या घरात पत्नी व मुलासह राहत होते. सकाळी 9 वाजेच्या दरम्यान अचानक घरातील पत्रामध्ये करंट संचारला. चिमुकल्या बबलूचा खेळता खेळता त्या पत्र्याचा स्पर्श झाला आणि त्याला विजेचा धक्का बसला. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला तिर्थपुरी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सध्या लॉकडाऊन असल्याने कुटुंबीयाने अवघ्या तासाभरातच त्याचा अंतविधीही आटोपून टाकला. संपादन - अक्षय शितोळे
First published:

पुढील बातम्या