विशाल रेवडेकर, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग, 24 जानेवारी : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कोकणात जोरदार राडा झाला आहे. कणकवलीच्या कनेडी गावामध्ये हा वाद झाला आहे. भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. माघी गणेश जयंतीच्या पूर्व संध्येला कणकवलीत राजकीय तणाव निर्माण झाला आहे. किरकोळ बाचाबाचीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झालीये. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या राड्यानंतर कनेडी गावात तणावपूर्ण वातावरण आहे.
वाद आणखी वाढू नये म्हणून पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केला आहे.
कोकणामध्ये राजकीय राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले#Shivsena #BJP #Kokan pic.twitter.com/iSAlfj4gmB
— News18Lokmat (@News18lokmat) January 24, 2023
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कनेडी गावामध्ये क्यूआरटी, आरसीपी आणि इतर तालुक्यांमधील पोलीस दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही एकत्र जमायला सुरूवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.