नारायण राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मिळवला विजय

नारायण राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मिळवला विजय

कोकणातील लक्षवेधी निवडणुकीत भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला चितपट केलं आहे.

  • Share this:

दिनेश केळुसरकर, 30 डिसेंबर : सावंतवाडी आणि रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी आज झाली. कोकणातील या लक्षवेधी निवडणुकीत भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला चितपट केलं आहे. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजू परब 313 मतांनी विजयी झाले आहेत.

नगरपरिषद निवडणुकीत नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या संजू परब यांचा विजय झाल्याने सावंतवाडीत तब्बल 28 वर्षांनी परिवर्तन झालं आहे. कारण आतापर्यंत या नगरपरिषदेवर शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांचं वर्चस्व होतं. नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव हा केसरकरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण नारायण राणे आणि दीपक केसरकर या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा या निवणुकीत पणाला लागली होती.

LIVE : मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण इथं कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. सावंतवाडी नगरपरिषदेत फक्त 18 हजार मतदार असले तरी इथे नारायण राणे आणि दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती.

राणे विरुद्ध केसरकर

नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोकणात सातत्याने त्यांचा शिवसेनेसोबत संघर्ष झाला. या संघर्षातून अनेकदा कोकणात हिंसाही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कोकणात राणे-केसरकर सामना रंगू लागला.

शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून युवासेनाप्रमुखांची मंत्रिपदी वर्णी लागणार

यंदाच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राणे-केसरकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झाडण्यात आल्या होत्या. 'नारायण राणे यांच्याकडील पैशाला रक्ताचा वास आहे,' असा गंभीर आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकरांच्या या टीकेला राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

'मर्द होतास तर का नाही केलास तपास ? असा सवाल नारायण राणे यांनी गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या दीपक केसरकर यांना केला. 'केसरकरांनी सावंतवाडीत एकही विकास प्रकल्प सुरू केला नाही. माझ्यावर खूनाचा आरोप करणाऱ्या केसरकरांनी 5 वर्ष गृहराज्यमंत्री असताना तपास का केला नाही,' असा सवाल करत नारायण राणेंनी केसरकर यांना लक्ष्य केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2019 11:14 AM IST

ताज्या बातम्या