कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ट्रॅकवर कोसळली दरड

कोकण रेल्वेच्या मार्गावर नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने हा मार्ग तुर्तास बंद करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 06:21 PM IST

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ट्रॅकवर कोसळली दरड

मुंबई, 04 सप्टेंबर : मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन सध्या विस्कळीत झाले आहे. त्यातच आता कोकणाकडे जाणारी रेल्वेवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळं गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या भक्तांचे हाल झाले आहे.

कोकण रेल्वेच्या मार्गावर नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने हा मार्ग तुर्तास बंद करण्यात आला आहे. त्यामुळं कोकणात येणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले आहेत. रेल्वेच्या वतीनं तुर्तास हा मार्ग बंद करण्यात आला आहे. सकाळी 11.30 वाजता रेल्वेच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. त्यामुळं मुंबईहून गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या मुंबईकरांना हाल सहन करावे लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान डाऊन लाईनवर दरड कोसळल्याने तसेच, चिखल साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, अप लाईनवरील वाहतूक सध्या सुरु आहे. रेल्वेच्या वतीनं युध्दपातळीवर सध्या डाऊन लाईनवरील दरज हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळं लवकरात लवकर ही लाईन वाहतुकीसाठी सुरु करण्यात येईल.

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Loading...

येत्या 24 तासांत राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. मुंबई वेधशाळेने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असं सांगितलं आहे. पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने weather updates कडे लक्ष ठेवावं, असंही म्हटलं आहे. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाच्या हजेरीने उत्साहावर पाणी फिरलं आहे.

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...