• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • शिकाऱ्याची झाली शिकार? पोटात गोळी लागून तरुणाचा मृत्यू 

शिकाऱ्याची झाली शिकार? पोटात गोळी लागून तरुणाचा मृत्यू 

'आईला भाकरी करून ठेव, मी काजूच्या बागेत जाऊन येतो', असे सांगून ते जंगलात गेले. मात्र परत आलेच नाही.

  • Share this:
दापोली, 01 एप्रिल :  'आई आपल्या बागेतील काजू बिया आणायला जातोय, भाकरी करून ठेव, अस सांगून  गेलेल्या 35 वर्षीय विनोद मनोहर बैकर या तरुणाचा जंगलात (forest) गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना दापोली (Dapoli) तालुक्यातील साकुर्डे येथे समोर आली आहे.  मात्र, त्याची शिकार झाली की केली याचे कारण कळू शकले नाही. बुधवारी 10 वाजेच्या दरम्यान  विनोद बैकर हे साकुर्डे लाडवाडी येथील शेजारी शिकारीसाठी गेले होते. काही दूर अंतरावर गेले असता  बंदुकीची गोळी पोटात घुसून ते या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले. दापोली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सना खान पितेय सोन्याची कॉफी; किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क ज्या ठिकाणी विनोद यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहाशेजारीच सिंगल बार बंदूक आढळून आली आहे. त्यांच्या एका पायातील चप्पल बाजूलाच पडलेली आहे तर ते पाय घसरून पडले, असतील असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. जेव्हा त्यांचा पाय घसरून ते पडले तेव्हा चुकून बंदुकीचा चाप ओढला जाऊन गोळी त्यांच्या पोटात घुसली असावी,असा तर्क लावला जात आहे. परंतु, नेमकी ही बंदूक कोणाची? बंदूक मालक समोर का आले नाहीत तसंच विनोद यांच्याकडे बंदूक कशी आली त्यांच्यासोबत दुसरे कोणी होते का सर्व प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. IPL 2021 : 'ही दोस्ती तुटायची नाय' ; धोनीसोबतचा फोटो शेअर करत रैनाचा खास मेसेज 'आईला भाकरी करून ठेव, मी काजूच्या बागेत जाऊन येतो', असे सांगून ते जंगलात गेले. मात्र, ते शिकारीला गेल्याचे कोणालाही माहित नव्हते. पत्नीला सुद्धा याबाबत काहीही कल्पना नसल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी देवाची पालखी येणार म्हणून काजूच्या बिया काढण्यासाठी ते बागेत जाणार होता. विनोद हा हरहुन्नरी कलाकार होता. ड्रायव्हर, मेकेनिकल, इलेक्ट्रिशन, मिस्त्री सर्व प्रकारची कामे त्यांना येत होती. त्यामुळे पंचक्रोशीत हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. गेल्या तीन वर्षापूर्वी पंढरीची वारी करून ते माळकरी बनले होते, त्यामुळे मटन मच्छी ते काहीही खात नसल्याचे समोर आले असून ते पूर्णपणे शाकाहारी बनले असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. मग ते शिकारीला का गेले असावेत असा प्रश्न सुद्धा पडत आहे. 'मोदी सरकारचा तो निर्णय एप्रिल फूल तर नाही ना?' अशोक चव्हाण यांची खरमरीत टीका पुढील तपास दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बीट अंमलदार प्रमोद झगडे यांना याबाबतची खबर मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व उप विभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती देऊन या बाबतचा तपास करत आहे. मृत्यू कसा झाला याबाबत पोलीस तपासातून निष्पन्न होणार आहे.
Published by:sachin Salve
First published: