मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रंग माझा वेगळा, रत्नागिरीत आढळला चक्क पांढरा कावळा!

रंग माझा वेगळा, रत्नागिरीत आढळला चक्क पांढरा कावळा!

कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला.

कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला.

कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला.

रत्नागिरी, 26 मे : कावळा म्हटलं काळा रंग हे गणित ठरलेलं आहे. पण पांढरा फटफटीत कावळा ( white crow) असं कुणी म्हटलं तर विश्‍वास बसत नाही. पण पांढरा कावळा रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील काळबादेवी (kalabadevi gaon) गावात शेट्येवाडीत आढळला. त्यामुळे या पांढर्‍या कावळ्याची एकच चर्चा रंगली आहे.

काळबादेवी इथं राहणारे शेखर शेट्ये यांच्या घराजवळ चार दिवसांपूर्वी हा पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आला. घराजवळ असलेल्या कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी कबुतर असावे असे वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो कावळाच वाटला.

त्या पांढर्‍या पक्षाची ठेवण, चोच आणि डोळा हा नेहमीच्या कावळ्यासारखाच होता. थोडावेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला. तो कावळ्याच. शेखर यांनी पांढर्‍या कावळ्याची गोष्ट शेजारच्यांना सांगितली. सर्वच जणं त्याला पहायला आले. काहींनी छायाचित्रे काढून सोशल मीडियावरही शेअर केली. पांढरा कावळा हा दुर्मिळ आहे. त्यामुळे हा कावळा काळबादेवीकरांसाठीच नव्हे तर रत्नागिरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

परमबीर सिंग यांच्या अडचणीत भर, क्रिकेट सट्टेबाजानं केला 'हा' गंभीर आरोप

याबाबत शेखर शेट्ये म्हणाले की, 'दुसरा पक्षी आला की कावळे त्याला बोचून काढतात; मात्र पांढर्‍या रंगाचा पक्षी इतर कावळ्यांच्या जोडीने खाद्य खाण्यासाठी घराच्या जवळ निर्धास्त येत आहे. त्यामुळे तो त्यांच्यातलाच असावा असा अंदाज आम्ही केला.'

महिलेने दारू पिऊन क्लबच्या बाहेर केलं धक्कादायक कृत्य; Video पाहून संताप येईल!

कावळ्याचा पांढरा रंग हा नैसर्गिक आहे. काळबादेवी येथील तो कावळा ल्युकेस्टिक आहे. काळा रंग येण्यासाठी शरीरात मेलिनीनचे द्रव्य आवश्यक असते. ते कमी असल्यामुळे कावळ्याला पांढरा रंग येतो. काळबादेवीत आढळलेला तो कावळा ल्युकेस्टिक आहे. एका अर्थाने हा पांढरा कावळा नाही तर त्याच्यातील अनुवंशिकतेमुळे तो पांढरा राहिला आहे, असं पक्षी तज्ज्ञ प्रतिक मोरे यांनी सांगितलं.

First published:
top videos