Home /News /maharashtra /

Planting Hobby : पुण्यातील 77 वर्षांच्या आजीबाईंची कमाल, पाहा, त्या कुठे लावतात रोपे? 

Planting Hobby : पुण्यातील 77 वर्षांच्या आजीबाईंची कमाल, पाहा, त्या कुठे लावतात रोपे? 

title=

रोपे लावण्याच्या छंद अनेकांना असतो. मात्र, या छंदामुळे एक वेगळं कलात्मक दृष्टीकोन जपणं ही या पुण्यातील आजीबाईंची खासियत आहे. पुष्पा नवले असे या छंदवेड्या आजीबाईंचे नाव आहे.

  पुणे, 22 मे : व्यक्ती हा छंद वेडा असतो. त्याला वेगवेगळे प्रकारचे छंद (Hobbies) असतात. कुणाला पेंटींग (Painting) करण्याचा, तर कुणाला चित्र (Drawing) काढण्याचा तर कुणाला व्यायामाचही छंद असतो. झाडे लावण्याचा छंद असणारीही लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. इतकेच नव्हे तर निवृत्तीनंतरही आपले छंद जोपासणारी अनेक लोक तुम्हाला समाजात वावरताना दिसतील. अशाच एका छंदवेड्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण आज जाणून घेऊया. पुष्पा नवले असे या छंदवेड्या आजीबाईंचे नाव आहे. त्या 77 वर्षांच्या आहेत. या आजीबाईंना रोपे लावण्याचा छंद (Hobby of Planting) आहे. रोपे लावण्याच्या छंद अनेकांना असतो. मात्र, या छंदामुळे एक वेगळं कलात्मक दृष्टीकोन जपणं ही या पुण्यातील आजीबाईंची खासियत आहे. हेही वाचा - कोणत्याही अ‍ॅपशिवाय समजणार अनोळखी फोन नंबरचे नाव! 'ट्राय' उभारणार खास यंत्रणा
  वेगळेपण काय?
  या 77 वर्षाच्या आजीबाई शंख, पायातले शूज, मिक्सरच्या भांड्याचे झाकण, ज्यूसरचे भांडे, अशी कोणतीही वस्तू असो याचा वापर या आज्जी रोपे लावण्यासाठी करतात. गेल्या काही वर्षांपासून पुष्पा आज्जींनी आपला छंद घरातील टेरेसवर जोपासला आहे. या रोपांसाठी त्या खत देखील घरीच बनवतात. तसेच यामध्ये घरातील कचऱ्याचाही त्या वापर करतात.
  First published:

  Tags: Hobby, Old woman, Pune

  पुढील बातम्या