मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आव्वाज कुणाचा? शिंदेंचा की ठाकरेंचा? दसरा मेळाव्याला ध्वनी प्रदूषणाचा अहवाल काय सांगतो पाहा

आव्वाज कुणाचा? शिंदेंचा की ठाकरेंचा? दसरा मेळाव्याला ध्वनी प्रदूषणाचा अहवाल काय सांगतो पाहा

शिंदे गट आणि ठाकरेंचा दसरा मेळाव्यादरम्यान आवाज फाऊंडेनचा ध्वनी प्रदूषणाचा अहवाल समोर आला आहे.

शिंदे गट आणि ठाकरेंचा दसरा मेळाव्यादरम्यान आवाज फाऊंडेनचा ध्वनी प्रदूषणाचा अहवाल समोर आला आहे.

शिंदे गट आणि ठाकरेंचा दसरा मेळाव्यादरम्यान आवाज फाऊंडेनचा ध्वनी प्रदूषणाचा अहवाल समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 ऑक्टोबर : मुंबईत काल शिवसेनेचे दोन मेळावे आयोजित करण्यात आले होते. एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानावरील भव्य दसरा मेळावा, तर दुसरा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील दसरा मेळावा. या दोन्ही मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. दोन्ही मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

मात्र, या शिंदे गट आणि ठाकरेंचा दसरा मेळाव्यादरम्यान आवाज फाऊंडेनचा ध्वनी प्रदूषणाचा अहवाल समोर आला आहे. आवाज फाऊंडेशनचा 2022 मधील दोन शिवसेना दसरा मेळाव्यातील ध्वनी प्रदूषणावरील अहवाल दाखवतो की शिवाजी पार्क येथे सर्वाधिक डेसिबल पातळी म्हणजे 101.6dB आणि BKC येथे आवाजाची पातळी ही 88.5 dB होती.

आवाज फाऊंडेशनच्या या अहवालावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यादरम्यानच्या आवाजाची पातळी ही शिंदे गटाच्या आवाजाच्या पातळीपेक्षा जास्त होता, असे समजत आहे. दरम्यान, याआधी 2019 मधील सर्वोच्च डेसिबल शिवाजी पार्कवर 93.9dB होता.

हेही वाचा - Shiv Sena Dasara Melava : होय गद्दारच! उद्धव ठाकरेंचा पहिला बाण, पाहा Live भाषण

दरम्यान, शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे उपस्थित होते. तसेच शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केली.

ते म्हणाले की, एकनाथ शिंदे माझ्या आवडीचा आहे. आता मुख्यमंत्री आहे म्हणून एकनाथराव बोलावं लागेल. पाच-सहा दिवस झाले मला फोन आले, तुम्ही शिंदे गटात गेलात का? अरे हा ठाकरे कोणाच्या गोठात बांधला जात नाही. शिंदे गटाने घेतलेल्या भूमिका मला आवडल्या, असेही ते यावेळी म्हणाले.

तसे आपल्या भाषणादरम्यान, जयदेव ठाकरे पुढे म्हणाले की, या व्यक्तीची महाराष्ट्राला आवश्यकता आहे, म्हणून प्रेमासाठी आलो आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यंतरीचा एकनाथला त्याला जवळच्यांनी संपवलं. त्याला एकटं पाडू नका, असे आवाहन करत त्यांनी शिवसेनेवर नाव न घेता टीका केली.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray