मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोकणात येवा विमानाने! पण चिपी विमानतळ कोणाला आहे जवळ, कोणाला लांब?

कोकणात येवा विमानाने! पण चिपी विमानतळ कोणाला आहे जवळ, कोणाला लांब?

 चिपी विमानतळापासून रत्नागिरी शहर जवळपास 168 किलोमीटर आहे तर कोल्हापूरचे विमानतळ त्यापेक्षा कमी अंतरावर म्हणजेच 140 किलोमीटरवर आहे.

चिपी विमानतळापासून रत्नागिरी शहर जवळपास 168 किलोमीटर आहे तर कोल्हापूरचे विमानतळ त्यापेक्षा कमी अंतरावर म्हणजेच 140 किलोमीटरवर आहे.

चिपी विमानतळापासून रत्नागिरी शहर जवळपास 168 किलोमीटर आहे तर कोल्हापूरचे विमानतळ त्यापेक्षा कमी अंतरावर म्हणजेच 140 किलोमीटरवर आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर : कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यात विमानसेवा सुरू झाली आहे. कोकणवासीयांचा या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेंगुर्ले तालुक्यातील चिपी माळरानावर हे विमानतळ (Chipi Airport) साकारण्यात आलंय. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना विमानतळापासूनचे अंतर खूप असल्यानं विमान प्रवास करणं अवघड आहे.

रत्नागिरीतील कोकणवासियांना चिपीपेक्षा कोल्हापूरचे विमानतळ जवळ पडू शकते. चिपी विमानतळापासून रत्नागिरी शहर जवळपास 168 किलोमीटर आहे तर कोल्हापूरचे विमानतळ त्यापेक्षा कमी अंतरावर म्हणजेच 140 किलोमीटरवर आहे. जवळपास अर्ध्या रत्नागिरी जिल्ह्याला कोल्हापूरचे विमानतळ जवळ पडते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गपासून विमानतळ सर्वात जास्त अंतरावर तर सर्वात कमी अंतर मालवण शहरापासून असल्याचे दिसून येत आहे. वेंगुर्ले तालुक्यात सिंधुदुर्ग विमानतळ असूनही वेंगुर्ले शहरापासून ते जवळ नाही. उलट सिंधुदुर्ग विमानतळापासून 18 किमी.वरील मालवण शहराला हे विमानतळ सर्वात जवळ आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ (चिपी) ते मुंबई हा प्रवास केवळ 1 तास 25 मिनिटांचा आहे. कुडाळ शहर ते सिंधुदुर्ग विमानतळ 23 कि.मी., सिंधुदुर्गनगरी-सिंधुदुर्ग विमानतळ 35 कि.मी. सावंतवाडी-चिपी सागरीमार्गे 45 कि.मी.,सावंतवाडी-पिंगुळी-पाट मार्गे 39 कि.मी.

हे वाचा - अविवाहित गर्भवतीला गर्भपात करता येणार? त्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

वैभववाडी-कणकवली ते सिंधुदुर्ग विमानतळ 93 कि.मी., विजयदुर्ग-देवगड-मालवण ते विमानतळ 101 कि.मी., दोडामार्ग-बांदा-पिंगुळी-पाट ते चिपी 78 कि.मी. असे जिल्ह्यातील प्रमुख शहरांपासून विमानतळापर्यंतचे अंतर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणावरूनचे सिंधुदुर्ग विमानतळापर्यंत येण्याचे अंतर मालवण शहर वगळता अर्धा तासापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

हे वाचा - जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला जबरदस्त धक्का, भाजपच्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

वैभववाडीतून सिंधुदुर्ग विमानतळापर्यंत खासगी गाडीने येण्यास दोन तास लागतात, विजयदुर्ग -चिपी दीड तास, सिंधुदुर्गनगरी ते विमानतळ 45 मिनीटे, मालवण ते विमानतळ 10 मिनिटे, कुडाळ ते विमानतळ 30 मि., सावंतवाडी ते विमानतळ 45 मि., दोडामार्ग ते विमानतळ 1 तास 45 मि. आंबोली ते विमानतळ 1 तास 15 मि.असा वेळ लागू शकतो.

First published:

Tags: Airport, Sindhudurg news