अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याने कल्याणमध्ये तरुणाला भोसकले

अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याने कल्याणमध्ये तरुणाला भोसकले

अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. कल्याण पूर्व भागात ही घटना घडली आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे, (प्रतिनिधी)

कल्याण, 18 जुलै- अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. कल्याण पूर्व भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी हल्लेखोर दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पाणी अंगावर उडाल्याचा जाब विचारल्याने दुचाकीस्वाराने तरुणाला भोसकल्याची घटना बुधवारी (17 जुलै) रात्री कल्याणमध्ये घडली. या घटनेत उमेश बेंडाळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. कल्याणच्या लोकग्राम परिसरात पत्नी आणि लहान मुलीसह राहणारा उमेश बेंडाळे हा तरुण बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर निघाला. मुलीची औषधी घेऊन घरी परतत असताना लोकग्रामच्या नाल्यावरील पुलाजवळ एक भरधाव दुचाकीस्वार आला आणि त्यांना कट मारून अंगावर रस्त्यावरील खड्ड्यातले पाणी उडवून गेला. उमेश आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा मेहुणा केशव यांनी याबाबत दुचाकीस्वाराला जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला आणि वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यादरम्यान दुचाकीस्वार शैलेंद्र शर्मा याने त्याच्याकडचा चाकू काढला आणि थेट उमेश बेंडाळे याच्या पोटात भोसकला. त्याचा साथीदार प्रतीक परमार याने केशवला धरून ठेवले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या उमेश याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमेशचा प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या सगळ्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी काही तासभरात मुख्य आरोपी शैलेंद्र शर्मा याला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेशच्या कुटुंबियांनी केली आहे.

औरंगाबादेत MIM नगरसेवकांनी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात खाल्ले डबे

Published by: Sandip Parolekar
First published: July 18, 2019, 4:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading