BREAKING : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, प्रचार सभेत हातावर वार!

BREAKING : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, प्रचार सभेत हातावर वार!

ओमराजे हे कैलास पाटील यांच्यासाठी प्रचार करत असताना त्यांच्या ताफ्यात एक तरुण घुसला आणि त्याने निंबाळकरांवर हल्ला केला.

  • Share this:

कळंब (उस्मानाबाद), 16 ऑक्टोबर : शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कळंब तालुक्यातल्या नायगाव पाडोळी गावात तरुणाने चाकूने हल्ला केला असल्याचं सांगण्यात येत आहे. एका तरुणाने ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला केला आणि पळ काढला. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

ओमराजे हे कैलास पाटील यांच्यासाठी प्रचार करत असताना त्यांच्या ताफ्यात एक तरुण घुसला आणि त्याने निंबाळकरांवर हल्ला केला. यावेळी चाकू त्यांच्या हातावर लागला त्यामुळे ते थोडक्यात बचावले. दरम्यान, हल्ला झाल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. हा हल्ला का करण्यात आला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून आता पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहेत.

कसा झाला हल्ला?

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला होताच ओमराजे यांनी हात झटकला आणि त्यामुळे त्यांच्या घड्याळावर चाकूने मार बसला. यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हाताला किरकोळ जखम झाली आहे.

दरम्यान, जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप असून मला कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. तर 'घड्याळावर वार झाला' असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. आपण हल्ला केलेल्या व्यक्तीला कधीही भेटलो नाही अशी महत्त्वाची माहिती देखील ओमराजे यांनी माध्यमांना दिली. खरंतर हल्लेखोराला पोटावर वार करायचे होते पण माझा हात आडवा आल्यामुळे मी वाचलो असल्याचंही ते म्हणाले. माझा जीव घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. तर या संदर्भात ओमराजे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

'महाराष्ट्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून तर ओमराजे निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास करण्यात येणार आहे. ओमराजे निंबाळकर हेदेखील यासंबंधी पोलिसांना माहिती देतील. तर हे राजकीय कारस्थानं कोणी केलं हे शोधणं महत्त्वाचं आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 12:03 PM IST

ताज्या बातम्या