8 वर्षांपासून प्रेमसंबंध.. तिने लग्नास दिला नकार, प्रियकराने चाकूने केले सपासप वार

8 वर्षांपासून प्रेमसंबंध.. तिने लग्नास दिला नकार, प्रियकराने चाकूने केले सपासप वार

लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 9 ऑगस्ट-  लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात गुरुवारी रात्री पावणे नऊ ही घटना घडली. वडकीनाका येथे राहणारी 25 वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख आणि चंदन चव्हांडके अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तरुणीचे 2011 मध्ये रामटेकडी येथे राहायला असताना तिच्या घरासमोर राहणाऱ्या प्रसाद सोनवणे याच्याबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. 7 ते 8 वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. दरम्यान ही तरुणी आपल्या कुटुंबासह वडकीनाला येथे राहायला गेली. मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रसाद या तरुणीला लग्न करु म्हणून मागे लागला होता. मात्र, ती त्याला टाळत होती. दारु पिऊन त्याने तिला एकदा मारहाणही केली होती. त्यामुळे तिने त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले होते. तरीही तो तिला वारंवार फोन करून त्रास देत होता. 8 ऑगस्टला ती सायंकाळी साडेसातला कामावरुन बाहेर पडल्यावर प्रसाद दोन मित्रासह तिथे आला. त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसायला लावले. रिक्षा मगरपट्टा सिटीमध्ये गेल्यावर त्याने पुन्हा तिला माझ्याबरोबर लग्न कर, असा हट्ट धरला. तिने नकार देताच त्याने आपल्याकडील चाकू काढून तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले. 'तू माझ्याशी लग्न केले नाही तर तू जिवंत असेपर्यंत मी तुला त्रास देणार, तुला ठार करणार, तुझे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. नंतर तिला थेट तो आपल्या घरी घेऊन गेला. या घटनेची माहिती मिळताच या तरुणीची बहीण प्रसादच्या घरी आली. तिने तिला हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात दाखल केले. नंतर मुंढवा पोलिसांत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

First published: August 9, 2019, 4:13 PM IST
Tags: lovepune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading