Home /News /maharashtra /

मोठी बातमी! प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

मोठी बातमी! प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगर, 24 मे : कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकरी महाराजांचं महाराष्ट्रात (Maharashtra) मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांच्या आगामी दिवसांचा कार्यक्रम आधीच ठरलेला असतो. पण इंदोरीकर महाराजांचे कार्यक्रम या आठवड्यात होणार नाहीत. इंदोरीकर यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध पत्रक जारी करत देण्यात आली आहे. कार्यक्रम रद्द झाल्याने इंदोरीकर महाराजांनी आयोजक आणि नियोजकांकडे दिलगीरी व्यक्त केली आहे. पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे? "समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना प्रकृती अस्वसाथाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे. त्यामुळे 23 मे ते 30 मे 2022 या कालावधीत सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत", असं प्रसिद्ध पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. (महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, एकत्र लढणार?) "इच्छा असूनही कार्यक्रमाला येऊ शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत", असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. "वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्ण नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाठिशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा", अशी भावना इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली आहे. इंदुरीकर महाराज नेहमी चर्चेत इंदुरीकर महाराज हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत येतात. त्यांनी कीर्तनात केलेल्या काही वक्तव्यांमुळे मोठा वाददेखील उफाळला होता. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यावेळी संबंधित प्रकरण प्रचंड तापलं होतं. इंदुरीकर महाराजांचा मोठा चाहता वर्ग आहेत. तसेच इंदुरीकर यांचे यूट्यूबवर कीर्तनाचे प्रचंड व्हिडीओ आहेत. त्यांच्या कीर्तनातून ते समाजातील चुकीच्या गोष्टींवर मिश्किलपणे टीका करतात.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या