गुजरातमध्ये शिवसेना-काँग्रेस युती हा सोमय्यांचा जावईशोध-भाई जगताप

गुजरातमध्ये शिवसेना-काँग्रेस युती हा सोमय्यांचा जावईशोध-भाई जगताप

गुजरातमध्ये काँग्रेस 75 ते 80 सिट येतील, गुजरातमध्ये काँगेस ची सत्ता येऊ शकते असा दावा ही भाई जगताप यांनी केला आहे.

  • Share this:

दापोली,12 नोव्हेंबर: केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपासोबत असताना गुजरात निवडणुकित शिवसेनेची काँग्रेस सोबत छुपी युती असल्याचे बोलणे हा मोठा विनोद आहे असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांचा हा जावई शोध असल्याचं ते म्हणाले.

गुजरात निवडणुकीत शिवसेना काँग्रेसची छुपी असल्याचं वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केलं होतं . गुजरात निवडणुकीत शिवसेना काँग्रेसची छुपी असल्याचं वक्तव्य भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केलं होतं. तसंच या निवडणुकांनंतर शिवसेनेची केविलवाणी परिस्थिती होईल असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी टीका केलीय. गुजरातमध्ये शिवसेनेची ताकद नाही. असं सांगत आमचा सोशल इंजिनीअरिंग फॉर्म्यूला विजय होईल, गुजरातमध्ये काँग्रेस 75 ते 80 सिट येतील, गुजरातमध्ये काँगेस ची सत्ता येऊ शकते असा दावा ही भाई जगताप यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे कॉंग्रेस मेळावा निमित्त आले होते.

आता खरंच काँग्रेसचं सोशल इंजिनिअरिंग चालतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 12, 2017, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading