Home /News /maharashtra /

ठाकरे-पवारांचं सरकार घोटाळेबाज, NETFLIX वर डॉक्युमेंटरी होईल; किरीट सोमय्यांचा टोला

ठाकरे-पवारांचं सरकार घोटाळेबाज, NETFLIX वर डॉक्युमेंटरी होईल; किरीट सोमय्यांचा टोला

महाराष्ट्रातील ठाकरे आणि पवारांचं सरकार (Kirit Somayaa criticizes MVA government in Maharashtra for corruption) घोटाळेबाज असून अजित पवारांच्या घोटाळ्यांवर नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी होईल, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील ठाकरे आणि पवारांचं सरकार (Kirit Somayaa criticizes MVA government in Maharashtra for corruption) घोटाळेबाज असून अजित पवारांच्या घोटाळ्यांवर नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी होईल, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या संपत्तीची माहिती घेण्यासाठी (Country’s biggest raid so far) सलग 7 दिवस रेड सुरू असून ही देशातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवारांच्या भिंतीच्या आत असणाऱ्या लॉकरमध्ये काही सापडलं, सर्व्हट क्वार्टरच्या आत जमिनीतून काही सापडलं, असं सांगत त्यांनी पवारांवर चौफेर टीका केली आहे. धाडीच धाडी चहूकडे आतापर्यंत अजित पवार यांच्याशी संबंधित 24 ठिकाणी  धाडी टाकण्यात आल्या असून  57 जणांची चौकशी झाली आहे. गेल्या चार दिवसांत पवारावर इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू आहेत. पण पैशाची टोटल लागत नसल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. पुण्यात कुठेही पाहिलं तरी पवारांचंच नाव सातबारावर असतं, असा टोला त्यांनी लगावला. रेकॉर्डवर एवढी संपत्ती असेल, तर प्रत्यक्षात किती असेल, असा सवालही त्यांनी केला आहे. जरंडेश्वर कारखान्यात घोटाळ्याचा पुनरुच्चार जरंडेश्वर साखर कारखान्याचे सभासद आपल्याला येऊन भेटल्याचा दावा सोमय्यांनी केला. 26 हजार सभासदांचा कारखाना काढून घेण्यात आला आणि तेव्हापासूनच या कारखान्याचा मालक कोण, हा सवाल आपण विचारत असल्याचा दावा त्यांनी केला. उच्च जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हटलं असून त्याची कागपत्रं आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. अजित पवारांनी अर्थमंत्री असताना लिलाव केला आणि स्वतःच्याच बेनामी कंपनीला तो विकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे अजित पवारांच्या बहिणींचा संदर्भ ज्या बेनामी कंपनीने हा कारखाना विकत घेतला, त्याचे संचालक विजया पाटील, त्यांचे पती मोहन पाटील, दुसऱ्या आहेत निता पाटील. या अजित पवारांच्या बहिणी आहेत. त्यामुळे संबंध नसताना बहिणींच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचा अजित पवारांचा दावा खोटा असल्यांही सोमय्या यांनी म्हटलं आहे. आपल्या नावे बेनामी मालमत्ता खरेदी करण्यात आली, याची माहिती अजित पवारांच्या बहिणींना नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे. हे वाचा - "मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांचा चिमटा, म्हणाले.. पवार कुटुंबीयांचा सहभाग नीता पाटील, विजया पाटील, मोहन पाटील यांची कल्पतरू ही कंपनी आहे. याची गुंतवणूक अजित पवारांच्या कंपनीत आहे. जरंडेश्वर कारखान्याचे 90 टक्के शेअर्स या ना त्या प्रकारे पवार कुटुंबीय आणि त्यांच्याशी संबंधित मंडळींचेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Ajit pawar, Income tax, Kirit Somaiya

    पुढील बातम्या