मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारमधल्या आणखी दोन मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार, किरीट सोमय्यांचा आणखी एक गौप्यस्फोट

सरकारमधल्या आणखी दोन मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार, किरीट सोमय्यांचा आणखी एक गौप्यस्फोट

किरीट सोमय्यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद आहे. या परिषदेत सोमय्या मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.

किरीट सोमय्यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद आहे. या परिषदेत सोमय्या मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.

किरीट सोमय्यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद आहे. या परिषदेत सोमय्या मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.

    मुंबई, 12 सप्टेंबर: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार आहेत. स्वतः त्यांनी शनिवारी याबाबत सांगितलं. मात्र त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे उघड न केल्याने त्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ठाकरे सरकारचा आणखी एका मंत्र्याचा घोटाळा पुराव्या सह सोमवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत घेऊन उघड करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

    किरीट सोमय्यांचा बजरंग खरमाटेंवर गंभीर आरोप, बंगल्याबाहेर घेतला Selfie

    काय म्हणाले किरीट सोमय्या
    माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने असून त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पाने आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. या घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार असल्याचंही ते म्हणालेत. त्यांनी मला मोकळीक दिलेली आहे. सोमवारी ही नावे मी उघड करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलंय. छगन भुजबळांचं सोमय्यांना प्रत्त्युत्तर किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकार आणखी अडचणीत येईल असे वक्तव्य केल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. भुजबळ म्हणाले, काही लोकांना हेच काम दिले असतील तर त्याला काय करणार. मात्र पहिले अपने आचल मे झांककर देखो..फिर दुसरे के उपर पथथर मारणे चाहिए... सरकार अडचणीत येणार नाही सर्वात मोठे कोर्ट जनता आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या