मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /किरीट सोमय्या म्हणतात, "जोड्याने मारण्यासाठी माझा जोडा संजय राऊतांच्या हातात देतो पण त्यांनी...."

किरीट सोमय्या म्हणतात, "जोड्याने मारण्यासाठी माझा जोडा संजय राऊतांच्या हातात देतो पण त्यांनी...."

Kirit Somaiya Press Conference: किरीट सोमय्या यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Kirit Somaiya Press Conference: किरीट सोमय्या यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Kirit Somaiya Press Conference: किरीट सोमय्या यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काल शिवसेना भवनात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आज सोमय्यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. इतकंच नाही तर संजय राऊत यांना एक आव्हानही दिलं आहे.

...तर माझा जोडा संजय राऊतांच्या हातात देईन

किरीट सोमय्या म्हणाले, मी असं कसं बोलणार की अन्वय नाईक फ्रॉड होता. ते प्रॉपर्टी टॅक्स भरतात. संजय राऊत म्हणतात की, जोड्याने किरीट सोमय्याला मारा...अरे बाबा जोड्याने मला मारणार तू? मग मारा ना... मी तयार आहे. मी माझाच जोडा देतो संजय राऊतला. 19 बंगले... मी माझा जोडा संजय राऊतच्या हातात द्यायला तयार आहे. त्यांनी रश्मी ठाकरेंचे 19 बंगल्यांच्या संबंधीत हे जे सर्व पुरावे मी दिले आहेत त्याबाबत रश्मी ठाकरेंना विचारावं. रश्मी ठाकरेंनी जर लिहून दिलं कि हा प्रॉपर्टी टॅक्स मी भरला नाही, आम्ही अर्ज केला नव्हता, ग्रामपंचायतीने आमच्या नावावर बंगले केले नाहीत. किरीट सोमय्यांनी या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केलेली नाहीये तर एक नाही दोन जोड्यांनी मारा.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं, संजय राऊत म्हणतात कि मी अलिबागमधील त्या जागेवर घेऊन जातो तिथे बंगले दिसले तर आम्ही माफी मागू आणि नाही दिसले तर किरीट सोमय्यांना जोड्याने मारु. हे किरीट सोमय्यांना जोड्याने मारण्याची गोष्ट आहे की रश्मी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलत आहेत संजय राऊत?. 19 बंगले हे कुणाच्या नावावर आहेत? संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्या नावावर आहेत का? रश्मी उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 या 19 बंगल्यांचा प्रॉपर्टी टॅक्स ग्रामपंचायतीत भरला. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर.

वाचा : संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्यांचा पलटवार, "उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल तर..."

जोड्याने कोणाला मारणार?

इतकेच नाही तर रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वी 10 वर्षांचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईक यांच्या नावाने 12 नोव्हेंबर 2020 ला रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे, किरीट सोमय्यांनी भरला नाही. संजय राऊत साहेब जोड्याने तुम्ही कोणाला मारणार आहात? असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते संजय राऊत?

"जो दलाल बोलतोय ना त्याला मराठीत भडवा म्हणतात. त्याने असं म्हटलं कि ठाकरे कुटुंबाने थोरलाई गावात अलिबागजवळ 19 बंगले बांधून ठेवले आहेत. माझं आव्हान आहे त्या माणसाला, दलाला आव्हान आहे, कधीही सांगा, आपण चार बसेस करु आणि त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन. आख्खी शिवसेना जोड्याने मारेन. दिशाभूल करायची. खोट्यापणा करायचा. कुठे आहेत 19 बंगले, चला पार्टी करु. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचे.

मराठी माणसांचा द्वेष करायचा. महाराष्ट्राविषयी असूया, हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षांपूर्वी हायकोर्टात अपील केलं होतं कि, मुंबईतील शाळेत मराठी भाषेत सक्तीची असू नये. हा भाजपचा फ्रंटमॅन? आधी त्याचं थोबाडं बंद करा.

वाचा : "बाप बेटे जेलमध्ये जाणार, Wait and watch, कोठडीचं Sanitization सुरू", संजय राऊत यांचं सूचक ट्विट

किरीट सोमय्या आणि मुलावर आरोप

काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या या दोघांवरही गंभीर आरोप केले होते. 'भाजपचे दलाल लोक, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कुटुंबीयांची प्रकरण बाहेर काढत आहे. पण फडणवीस सरकारच्या काळात सर्वात मोठा घोटाळा झाला. महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. अमोल काळे कोण आहे, विजय ढवंगाळे कोण आहे, सर्वांची खाती, बँकेतील व्यवहार, कुणाला कंत्राट दिले आहे? असा सवाल राऊत यांनी केला.

तसंच, राकेश वाधवानी याने भाजपला २० कोटी रुपये दिले होते. पीएमसी बँक घोटाळ्यात राकेश वाधवाणी याचे नाव समोर आले होते.किरीट सोमय्या हे राकेश वाधवानी याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. पण, निकॉन इन्फ्रास्ट्रकचर कंपनी कुणाची आहे. की कंपनी किरीट सोमय्यांची आहे. त्यांचा मुलगा नील सोमय्यांची आहे. निकॉन कंपनीसाठी पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसा वापरला असून वसईमध्ये गोखीवरे तालुक्यात हजारो कोटींचा प्रकल्प उभा केला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

'पीएमसी घोटाळ्याचा मास्टरमाईंड राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केले. कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली. फ्रँटमन असलेला लधानीच्या नावावर जमीन घेतली. 80 कोटी रुपये कॅश घेतली आहे. गोखीवरे वसई येतील ४०० कोटी रुपयांची जमीन साडेचार कोटींना घेतली आहे. एकूण दोन जमिनी घेतल्या आहे. या कंपनीचा डायरेक्टर किरीट सोमय्यांचा मुलगा आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज टू यासाठी पीएमसी बँकेचा पैसा आहे. याला कोणतीही परवानगी नाही. पर्यावरणाची कोणतीही परवानगी घेतली नाही' असा दावाही राऊत यांनी केला.

'आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे कि, त्यांनी ताबडतोब या कंपनीवर कारवाई करावी. पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

First published:
top videos

    Tags: BJP, Kirit Somaiya, Sanjay raut