मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्यांचा पलटवार, "उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल तर सोमय्यांचा वापर का करता?"

संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्यांचा पलटवार, "उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल तर सोमय्यांचा वापर का करता?"

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि इतरांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि इतरांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि इतरांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपच्या इतर नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं, संजय राऊत म्हणतात की मी अलिबागमधील त्या जागेवर घेऊन जातो तिथे बंगले दिसले तर आम्ही माफी मागू आणि नाही दिसले तर किरीट सोमय्यांना जोड्याने मारु. हे किरीट सोमय्यांना जोड्याने मारण्याची गोष्ट आहे की रश्मी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलत आहेत संजय राऊत?. 19 बंगले हे कुणाच्या नावावर आहेत? संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्या नावावर आहेत का? रश्मी उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 या 19 बंगल्यांचा प्रॉपर्टी टॅक्स ग्रामपंचायतीत भरला. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर.

जोड्याने कोणाला मारणार? 

इतकेच नाही तर रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वी 10 वर्षांचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईक यांच्या नावाने 12 नोव्हेंबर 2020 ला रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे, किरीट सोमय्यांनी भरला नाही. संजय राऊत साहेब जोड्याने तुम्ही कोणाला मारणार आहात? असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.

रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी टॅक्स भरला आहे आणि केव्हापासूनचा तर 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंतचा 19 बंगल्यांचा टॅक्स, आरोग्य कर, दिवाबत्ती कर हे भरण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबर 2020 का? कारण, 11 नोव्हेंबर 2020 ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या जमिनीच्या संबंधित, व्यावसायिक संबंध हे किरीट सोमय्यांनी उघडकीस आणले होते. हे बंगले अन्वय नाईक यांनी 2008 ला बांधले. 2009 पासून दरवर्षी या बंगल्यांचा कर आधी अन्वय नाईक आणि त्यानंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर भरत आहेत असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं.

वाचा : "बाप बेटे जेलमध्ये जाणार, Wait and watch, कोठडीचं Sanitization सुरू", संजय राऊत यांचं सूचक ट्विट

बंगलेच नाहीत तर टॅक्स का भरला?

अलिबागमधील 19 बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी भरला आहे. रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी कर भरला. जर बंगलेच नाहीत तर मग कर का भरला? असा सवालही यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.

ग्रामपंचायतीने दिलेले कागदपत्र किरीट सोमय्यांकडून सादर करण्यात आले. वनखात्याच्या जमिनीवर घरं बाधल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केली.

संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना किरीट सोमय्यांनी म्हटलं, 19 घरे आहेत की नाही हे पाहण्यासाठी रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांना घेऊन जा.

खुन्नस काढण्यासाठी सोमय्यांचा उपयोग का?

किरीट सोमय्यांनी पुढे म्हटलं, घर नसताना प्रॉपर्टी टॅक्स भरतात. मला तर हेच म्हणावं लागेल की घरे चोरीला गेली का असं म्हणायचं अन्वय नाईक यांनी तुमची फसवणूक केली? संजय राऊत तुम्हाला उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल तर मग निल सोमय्याचा उपयोग का करताय? थेट जाऊन सांगायचं होतं मुख्यमंत्री साहेब तुम्ही मला मदत करत नाहीयेत.

First published:
top videos

    Tags: BJP, Kirit Somaiya