मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shiv Sena vs BJP: कोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसैनिक अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Shiv Sena vs BJP: कोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसैनिक अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने

कोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसैनिक अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने

कोर्लई गावात किरीट सोमय्या दाखल, शिवसैनिक अन् भाजप कार्यकर्ते आमने-सामने

कोर्लई गावात भाजप नेते किरीट सोमय्या पोहोचले आहेत. किरीट सोमय्या यांच्यासोबत स्थानिक भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येत उपस्थित आहेत.

कोर्लई, रायगड, 18 फेब्रुवारी : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात (Korlai Village Raigad) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) यांचे 19 बंगले असल्याचा दावा सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत असे बंगलेच गावात नसल्याचा दावा केला. त्यानंतर आज किरीट सोमय्या स्वत: कोर्लई गावात दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजप कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर शिवसैनिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत. शिवसैनिक हे यावेळी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. घटनास्थळी मोठ-मोठ्याने घोषाबाजी सुरू आहे. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमकपणे घोषणाबाजी करत आहेत. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त असून कार्यकर्त्यांना शांत करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोर्लई ग्रामपंचायतीबाहेर हायव्होल्टेज ड्रामा किरीट सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयात साधारणत: 15 ते 20 मिनिटे उपस्थित होते. यावेळी कोर्लई ग्रामपंचायतीच्या बाहेर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. किरीट सोमय्या यांनी कालच जाहीर केलं होतं की, आपण कोर्लई गावाचा दौरा करणार आहोत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांत पुन्हा राड़ा होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पोलिसांनी आपला चोख बंदोबस्त आधीच ठेवला होता. सकाळी शिवसैनिकांनी शांत राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र, किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित झाले. किरीट सोमय्या यांनी शक्तीप्रदर्शन करणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षाचे झेंडे घेऊन उपस्थित होते. त्यामुळे शिवसैनिक सुद्दा आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ग्रामपंचायतीत काय घडलं? कोर्लई ग्रामपंचायतीत किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर दाखल झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केवळ एक पत्र दिलं आणि निघून गेले. त्यांनी इतर कुठल्याही कागदपत्रांची किंवा अन्य मागणी केली नसल्याचा दावा शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. वाचा : वडिलांनी 6 वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी, कल्याणमधील घटनेचा LIVE VIDEO आला समोर कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचे बंगले आहेत की नाही? सोमय्यांच्या आरोपांत किती दम? रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. त्यानंतर मंगळवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाही तर त्या किरीट सोमय्यांना जोड्याने मारा. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचातीतील कागदपत्रांचा पुरावा दिला. यामुळे खरंच हे बंगले आहेत की नाहीयेत असा प्रश्न सर्वांना पडला. याच संदर्भात न्यूज 18 लोकमतने पडताळणी करत थेट ग्रामपंचायत आणि कथित बंगले असलेल्या घटनास्थळी पाहणी केली. न्यूज 18 लोकमतच्या पडताळणीत काय आलं समोर? रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरुड कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. प्रत्यक्षात या जागेची पाहणी न्यूज 18 लोकमतच्या टीमने केली. ही पाहणी केली असता या जागेवर बंगले नसल्याचं समोर आलं. बंगले नाहीत तर या जागेवर नेमकं काय? या जागेत नारळीची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर ,पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नसल्याचे कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केलं आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Kirit Somaiya, Raigad, Shiv sena

पुढील बातम्या