मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महिलेला अश्लील शिवीगाळचा आरोप, किरीट सोमय्या राऊतांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात

महिलेला अश्लील शिवीगाळचा आरोप, किरीट सोमय्या राऊतांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाले.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 30 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाले. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिल व्हायरल होतेय. या ऑडिओक्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या मागणीसाठीच त्यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात जावून आपली भूमिका मांडली.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

किरीट सोमय्या यांनी वाकोला पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत शिवीगाळ आणि धमकी देत आहेत. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांसमोर मलाही अनेकदा शिवीगाळ केली आहे. त्यामुळे मला काळजी वाटत आहे. स्वप्ना पाटकर या महिलेच्या सुरक्षेसाठी मी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे. या महिलेला काही झालं तर त्याला जबाबदार पोलीस असतील. पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार आणि स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा देणार, असं आश्वासन दिलं आहे. माझी या प्रकरणी राज्य महिला आयोगासोबत बातचित झाली आहे. त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. या ऑडिओ क्लिपचा मुद्दा उपस्थित होवून 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. त्यांनी या प्रकरणातील आपल्या आरोपांचं खंडन केलेलं नाहीय. याचा अर्थ हाच आहे की, त्यांनी एका महिलेला शिवीगाळ आणि धमकी दिली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे", असं किरीट सोमय्या म्हणाले.

(सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी; बँकेच्या आवारात रक्ताचा सडा, ग्राहकाचा जागीच मृत्यू)

कथित ऑडिओ क्लिपची राज्य सरकारकडून दखल

दरम्यान, संजय राऊत यांच्या आवाजाच्या कथित ऑडिओ क्लिपची राज्य सरकारने दखल घेतली आहे. पोलीस विभागाने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याचे राज्य सरकारचे आदेश दिले आहे. समाज माध्यमांमध्ये फिरत असलेल्या ऑडिओ क्लिपची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 70 सेकंदाची ऑडिओ क्लिप आहे. काही वृत्तवाहिन्यांवर आणि समाजमाध्यमांमध्ये क्लिप दाखवण्यात आली आहे. संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील हा संवाद असल्याचा दावा करण्यात आला आहे.

First published:

Tags: Kirit Somaiya, Sanjay raut