किरीट सोमय्यांनी ट्वीट केलं की, तासगाव सांगली, येथील बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली. खरमाटेचा आणखी 4 बेनामी मिळकत सांगली येथे आहे. अनिल परबचे सहाय्यक खरमाटे यांच्याकडे सांगली, पुणे, बारामती, मुंबई येथे 40 हून अधिक अधिकृत/बेनामी मिळकत (properties) आहेत.किरीट सोमय्यांचा खरमाटेंच्या आलिशान बंगल्यासमोर सेल्फी pic.twitter.com/leYaXeYeCy
— News18Lokmat (@News18lokmat) September 6, 2021
खरमाटे यांना ईडीची नोटीस बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू मानले जातात. खरमाटे हे आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी आहे. त्यांना आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ईडीकडून खरमाटे यांना बजावलेलं हे पहिलं समन्स आहे. गेल्या आठवड्यात अनिल परब यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीनं बजावली होती.तासगाव सांगली, येथील बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली. खरमाटे चा आणखी ४ बेनामी मिळकत सांगली येथे आहे. अनिल परबचे सहाय्यक खरमाटे यांच्याकडे सांगली, पुणे, बारामती, मुंबई येथे 40 हून अधिक अधिकृत/बेनामी मिळकत (properties) आहेत.@BJP4Maharashtra pic.twitter.com/5YM3XWgKyu
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 6, 2021
आता खरमाटे यांना आलेल्या नोटीशीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर ईडीनं छापेमारी केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. या छापेमारी दरम्यान ईडीनं काही कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे.किरीट सोमय्यांचा खरमाटेंच्या आलिशान बंगल्यासमोर सेल्फी pic.twitter.com/uHjUZ0CBmn
— News18Lokmat (@News18lokmat) September 6, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, BJP, Kirit Somaiya, Shivsena