Home /News /maharashtra /

नवरा-बायको गाढ झोपेत असताना घरात घुसून केले चाकूने सपासप वार, नालासोपाऱ्यातील घटना

नवरा-बायको गाढ झोपेत असताना घरात घुसून केले चाकूने सपासप वार, नालासोपाऱ्यातील घटना


सदर घटना ही एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सदर घटना ही एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सदर घटना ही एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नालासोपारा, 18 डिसेंबर : मुंबई जवळील नालासोपारा (nalasopara) येथे एका विवाहित महिलेवर आणि तिच्या पतीवर चाकूने (kinife attack) प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून एका माथेफिरू तरुणाने दाम्पत्यावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नालासोपारा पुर्व येथील संतोष भुवन परिसरात ही घटना आहे. संतोष भुवन येथील लसवीर मंदिर येथे राहणारे अमित मिश्रा व त्यांची पत्नी ज्योती मिश्रा असं जखमी झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. शनिवारी पहाटे अमित मिश्रा व त्यांची पत्नी ज्योती घरात असताना 2 वाजेच्या सुमारास गाढ झोपेत होते. त्यावेळी ज्योती यांच्या ओळखीचा उत्तरप्रदेश येथील एक तरुण जबरदस्तीने घरात घुसला. घरात घुसल्यानंतर त्यांनी या दोघांवरती आपल्याकडील धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. या दोघांनीही त्याला प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यानंतर हा माथेफिरू तरुण तिथून पळून गेला. Mutual Fund : SIP सुरु करण्याची योग्य तारीख कोणती? पेमेंट वेळेत न झाल्यास काय? या माथेफिरू तरुणाने दोघांच्या गळ्यावर, मानेवर व हातावर चाकूचे वार झाल्यामुळे अमित आणि ज्योती  दोघेही गंभीर जखमी झाले आहे. दोघांनाही मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात हल्लेखोराविरोधात विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. Job Alert: खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई इथे 14 जागांसाठी नोकरीची संधी सदर घटना ही एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपीचा फोटो व मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या