मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आंब्याचा राजा हापूस फक्त कोकणचाच!

आंब्याचा राजा हापूस फक्त कोकणचाच!

त्यामुळं आता कर्नाटक, मद्रास, गुजरात किंवा वलसाडच्या हापूसला हापूस हे नाव लावता येणार नाही हे पक्क झालंय. त्याचबरोबर रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसला स्वतंत्र जीआय कायम झालं असून लवकरच त्याचं वेगळं पेटंट मिळणार आहे.

19 एप्रिल : हापूस फक्त कोकणचा. होय, तसा निर्णयच आज मुंबईत कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट यांनी आज दिलाय. त्यामुळं आता कर्नाटक, मद्रास, गुजरात किंवा वलसाडच्या हापूसला हापूस हे नाव लावता येणार नाही हे पक्क झालंय. त्याचबरोबर रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसला स्वतंत्र जीआय कायम झालं असून लवकरच त्याचं वेगळं पेटंट मिळणार आहे. यामुळे आता कोकणच्या राजाच्या वेगळेपणाची जगभरातली ओळख कायम राहणार आहे. पेटंट कंट्रोलरनं तसा निर्णयच दिलाय. हापूसच्या जीआय मानांकनावर सुरू असलेल्या वादावर आज महत्त्वाची सुनावणी होती. एंटॉप हिलमधल्या इंडियन पेटंट कार्यालयामध्ये ही सुनावणी होती.  एप्रिल 2017मध्ये 'रत्नागिरी हापूस' आणि देवगड हापूस या दोन आंब्यांना जीआयचे प्रमाणपत्र मिळले. मात्र त्यानंतर पेटंटसाठीचा वाद सुरू झालाय. जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन. याअंतर्गत एखाद्या भागातील कृषी उत्पादन आणि नैसर्गिक वस्तूंना त्याभागाची बौद्धिक संपदा असल्याचं शिक्कामोर्तब होतं. मात्र आता हापूस नक्की कुणाचा या पेटंटवरून वाद सुरू झाला.
First published:

Tags: Ratnagiri, Sindhudurg, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

पुढील बातम्या