अपहरण करून तरुणाची निर्घृण हत्या, पोलिसांनी 24 तासांत 5 आरोपींना ठोकल्या बेड्या

अपहरण करून तरुणाची निर्घृण हत्या, पोलिसांनी 24 तासांत 5 आरोपींना ठोकल्या बेड्या

तरुणाची पाच जणांनी हत्या केल्याचं समोर आले असून तुळींज पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे.

  • Share this:

नालासोपारा, 8 सप्टेंबर : नालासोपाऱ्यात 5 सप्टेंबर रोजी एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागचे 5 आरोपी पकडण्यात तुळींज पोलिसांना यश आलं आहे. आपल्या विरोधात तक्रार दाखल केली म्हणून या तरुणाची पाच जणांनी हत्या केल्याचं समोर आले असून तुळींज पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी परिसरातील रॉयल बिल्डिंगमध्ये राहणारा सद्दाम सय्यद (32) या तरुणाचा एव्हरशाइन येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी सकाळच्या वेळी मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने त्याच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती.

ही हत्या कोणी केली आणि हत्येचे कारण समोर आले नव्हते. तुळींज पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला होता. तपासादरम्यान तुळींज पोलिसांनी नालासोपारा येथे राहणाऱ्या दीपक कैलास मोरे (25 ), अमित संतलाल कुमार (22 ), निर्मळ बंबसिंग खडका (19), प्रशांत राजेश काटकर (24 ) आणि प्रणय राजेश काटकर (19 ) या पाच आरोपींना अटक केली आहे.

यामधील दीपक मोरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने मयत सद्दाम याने त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने आपल्या चार मित्रांच्या साथीने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. तुळींज पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 8, 2020, 6:24 PM IST

ताज्या बातम्या