मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अल्पवयीन मुलींना पळवून नेलं, नंतर मागितली खंडणी ; तृतीयपंथीयासह 2 तरुणांना अटक

अल्पवयीन मुलींना पळवून नेलं, नंतर मागितली खंडणी ; तृतीयपंथीयासह 2 तरुणांना अटक

दोन्ही तरुणांच्या तावडीतून मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं. या प्रकरणात एका तृतीयपंथीयाचाही समावेश होता.

दोन्ही तरुणांच्या तावडीतून मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं. या प्रकरणात एका तृतीयपंथीयाचाही समावेश होता.

दोन्ही तरुणांच्या तावडीतून मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं. या प्रकरणात एका तृतीयपंथीयाचाही समावेश होता.

  • Published by:  sachin Salve
बब्बू शेख, प्रतिनिधी येवला, 10 मार्च : अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून या दोन्ही सख्ख्या बहिणींना पळवून नेलं. त्यानंतर त्यांच्याच वडिलांकडून 50 हजारांची खंडणी मागण्यात आली. परंतु, मुलींच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि दोन्ही तरुणांच्या तावडीतून मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं. या प्रकरणात एका तृतीयपंथीयाचाही समावेश होता. मनमाडजवळील येवल्यातही धक्कादायक घटना घडली. येवला तालुक्यातील गुजरखेडे येथील एक 15 वर्षीय आणि दुसरी 17 वर्षाची असलेल्या या सख्ख्या बहिणींना संशयित राहुल पवार, दिनेश सोळशे यांनी लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेले होतं. या दोन्ही बहिणी गरीब घरात राहणाऱ्या होत्या. पण, पैशांची गरज भासल्यानंतर या आरोपींनी तिच्या वडिलांकडून अपहरण झालं म्हणून खंडणी मागण्याचा डाव आखला होता. त्यानंतर या दोघींना ओलीस ठेवून त्यांच्या वडिलांकडून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र, या मुलीचे वडील गरीब असल्यानं त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक भावरी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने सापळा रचून गुप्त माहिती मिळवली असता दोन्ही मुलींना कोपरगावला ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला आणि दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली. तसंच आरोपी राहुल, दिनेश या दोघांसह पूजा नावाच्या तृर्तीय पंथीयाला देखील अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती उपअधीक्षक समरसिंग साळवे यांनी दिली. व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाला 11 व्या मजल्यावरुन ढकललं दरम्यान, पैशावरुन झालेल्या वादातून पुण्यातील (Pune) एका तरुणाला 11 मजल्यावरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा (kondhwa) परिसरात घडली. या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर चिलवेरी (वय 24) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकातील पूल हौंसिग या इमारतीतील 11 व्या मजल्यावर चिलवेरी कुटुंब राहतात. त्यांनी आरोपीकडून 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. आरोपी पैसे मागण्यासाठी चिलवेरी यांच्या घरी आला होता. पैशावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी आरोपीसोबत आणखी दोघेजण होते. यावेळी पैसे न दिल्याच्या रागात आरोपींनी चिलवेरीला 11 व्या मजल्यावरुन ढकलून दिले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोंढवा पोलिसांकड़ून पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
First published:

पुढील बातम्या