देवेंद्र फडणवीसांच्या बॉलिंगवर हार्दिक पांड्याही चक्रावला; दोनवेळा झाला बोल्ड, पाहा VIDEO

देवेंद्र फडणवीसांच्या बॉलिंगवर हार्दिक पांड्याही चक्रावला; दोनवेळा झाला बोल्ड, पाहा VIDEO

राजकारणाच्या मैदानात फटकेबाजी करणारे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच क्रिकेट खेळताना दिसले.

  • Share this:

नागपूर, 25 जानेवारी : खासदार क्रिडा महोत्सव या स्पर्धेचा मोठ्या धुमधडाक्यात समारोप झाला. या स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरला. यावेळी हार्दिक पांड्या फक्त नागपूरात पोहोचलाच नाहीत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत क्रिकेटही खेळला.

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळताना दिसत नाही आहे. दरम्यान नागपूरात झालेल्या या कार्यक्रमात गडकरी आणि फडणवीस यांनी गोलंदाजी करत पांड्याला बाद करण्याचा प्रयत्न केला. पांड्यानेही या संधीचा फायदा घेत मोठे मोठे शॉट लगवात सगळ्यांचे मनोरंजन केले.

वाचा-रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपी निर्दोष

वाचा-अजित पवार यांचे मेहुणे आणि पदमसिंह पाटील यांचे बंधू अमरसिंह पाटील यांचे निधन

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नागपूरमध्ये गडकरी यांनी तर गुरदासपूरमध्ये सनी देओल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा समारोप शुक्रवारी करण्यात आला.

वाचा-मनसेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असतानाच संजय राऊत यांची मोठी घोषणा

हार्दिकने 22 सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपला शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. हा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना बेंगळुरूमध्ये खेळला गेला. तर, पांड्याने नववर्षात म्हणजे 1 जानेवारीला मॉडेल गर्लफ्रेंड नताशाशी साखरपूडा केला.

First published: January 25, 2020, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading