इंजिनिअरला पुलाला बांधल्याप्रकरणी खेडच्या नगराध्यक्षांना अटक

इंजिनिअरला पुलाला बांधल्याप्रकरणी खेडच्या नगराध्यक्षांना अटक

आर.के. बामणे आणि प्रकाश गायकवाड या इंजिनिअर्सना खेड मधील जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या रेलिंगला बांधण्यात आलं होतं.

  • Share this:

शिवाजी गोरे, दापोली 9 जुलै : अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरूद्ध सरकार कडक कारवाई करण्याच्या मानसिकतेत आहे. आमदार नितेश राणे यांचं प्रकरण ताजं असतानाच आता खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनाही अशाच एका प्रकरणात पोलिसांनी आज अटक केली. खेड सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तर लोकहितासाठी असे अनेक खटले अंगावर घेऊ असा इशारा मनसेने दिला आहे.

या प्रकरणी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह आणखी  दोन जणांना खेड पोलिसांनी केलं अटक केली असून दापोली  पोलीस कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आलीय.

VIDEO तुरुंगातून सुटणारे गुंड काढतात मिरवणुका, पोलिसांचा धाक संपला का?

महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता आर.के. बामणे आणि प्रकाश गायकवाड यांना खेड मधील जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या रेलिंग बांधण्यात आलं होतं. हे अधिकारी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याविरुद्ध असं पाऊल उचलण्यात आल्याचा खेडेकरांचा दावा आहे. मात्र कायदा हातात घेतल्याने ही कारवाई केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

अभियंत्याला पुलाला आणल्याप्रकरणी खेड सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर मनसेचे नेते वैभव खेडेकर व विश्वास मुधळे यांची दापोली येथील कारागृहात रवानगी करण्यात आली.

लोकसभेत राहुल बॅकबेंचर! सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे राहुलच्या जागेला धक्का

यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दापोली उप कारागृहाच्या बाहेर एकच गर्दी केली होती. जनतेच्या हितासाठी काम करत असताना असे 100 गुन्हे देखील आम्ही अंगावर घेऊ असे वैभव खेडेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. यावेळी बोलताना जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व दापोली नगर पंचायतीचे माजी नगरसेवक सचिन गायकवाड यांनी सरकार 353 कलमाचा गैरवापर करत असल्याचा आणि दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

First published: July 9, 2019, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading